Uncategorized

सीईओंचा दणका, नियम तोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

2 लाख 66 हजार रूपयांचा दंड केला वसूल, 23 अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील 48 गावांना दिल्या भेटी


बीड, दि. 13 : कोरोनाच्या संकटात नियम तोडणार्‍यांना सीईओ अजित कुंभार यांनी पुन्हा एखदा दणका दिला आहे. सीईओंच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या 23 अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील 48 गावांना भेटी दिल्या असून नियमतोडणार्‍यांवर दंडात्मक केली आहे. जिल्ह्यातून जवळपास 2 लाख 66 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुर्वीही कुंभार यांनी अशीच मोहिम जिल्हाभरात राबविली होती.
सध्या कोरोनाने प्रचंड प्रमाणात गती वाढविलेली आहे, याच कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काही नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र असे असतानाही नागरिकांकडून या नियमांचे पुर्णपणे उल्लंघन होत आहे. या अनुषंगानेच सीईओ अजित कुंभार यांनी अधिकार्‍यांची टिम नेमून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) यांनी केज तालुक्यातील पळसखेड (दंड 1000), बोरीसावरगाव (दंड 4050), दिघोळ अंबा (दंड 3000), प्र.मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे यांनी बीड तालुक्यातील चर्‍हाटा, येळंबघाट (दंड 4500), लपाविचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा (दंड 4000), डोंगरकिन्ही (दंड 8400), ग्रापापुचे कार्यकारी अभियंता एस.यु. खंदारे यांनी धारूर तालुक्यातील तेलगाव, भोगलवाडी, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अजय बहीर यांनी शिरूर तालुक्यातील खोपटी (दंड 1000), खालापुरी (दंड 1000), शिक्षणाधिकारी (मा.) खटावकर यांनी गेवराई तालुक्यातील तलवाडा, उमापुर यागावांना भेटी देवून दंडात्मक कारवाई केली, याबरोबरच देवडी, कुप्पा, लो.सावरगाव, मोरेवाडी, कडा, धामणगाव, टाकरवण, तालखेड, धोंडराई, जातेगाव, तिंतरवणी, टेंभूर्णी, चिंचवटी, बाहेगव्हाण, पाली, नाळवंडी, कुसळंब, दासखेड, बनसारोळा, पैठण, किट्टी वडगाव, मोगरा, राडी, वाघाळाराडी, धर्मापुरी, हेळंब, हाळंब, आष्टा, दादेगाव, कासारी, आसरडोह, बहीरवाडी, पिंपळनेर, जिरेवाडी, कर्‍हेवाडी या गावातही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या सर्व गावातून 2 लाख 66 हजार 610 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!