मुंबई

सुशांतच्या खात्यात होते 70 कोटी, रिया व तिच्या कुटुंबावर 50 लाखांची उधळपट्टी!


मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रोज नवा खुलासा होत असताना आता एक मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षांत सुशांतच्या खात्यामध्ये 70 कोटी रूपये होते, असा खुलासा सुशांतच्या बँक खात्याचा फॉरेन्सिक ऑडिटमधून झाला आहे.
मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बँक खात्याचा फॉरेन्सिक ऑडिट अहवाल ईडी आणि सीबीआयकडे सोपवला आहे. ग्रांट थॉर्टन या कंपनीच्या ऑडिट अहवालानुसार सुशांत रिया आणि तिच्या कुटुंबावर पैशांची उधळपट्टी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात त्याच्या खात्यातून रियाच्या खात्यामध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन झालेले नाही. गेल्या 5 वर्षात सुशांतच्या खात्यामध्ये 70 कोटी रुपये होते. त्यातील बरीच रक्कम खर्च झाली आहे. 70 कोटींपैकी मोठी रक्कम संपत्ती, लक्झरी कार आणि बाईक खरेदी करण्यासाठी वापरली गेली. अपार्टमेंटचे भाड्यासाठी देखील बराच पैसे खर्च झाला. सुशांतने कोट्यवधी रुपये एफडी आणि म्यूच्यूअल फंडमध्ये गुंतवले. शिवाय एक मोठी रक्कम सुशांतने केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देखील दान दिली होती. या ऑडिट अहवालानुसार सुशांतच्या बँक खात्यातील जवळपास 50 लाख रुपये रिया आणि तिच्या भावासाठी खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये युरोप टूर, शॉपिंग, स्पा, हॉटेल आणि तिकीट बूकिंगचा समावेश आहे. मात्र सुशांतकडून रियाच्या खात्यात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण झाले नाही.

‘त्या’ रकमेचीही होणार चौकशी
सुशांतने काही प्रॉडक्शन हाऊस, एजन्सीज आणि काही कंपनीना मोठी रक्कम देऊ केली होती. सुशांतने एवढी रक्कम का देऊ केली होती,याची देखील चौकशी केली जाणार आहे. दरम्यान या कंपन्यांचा आणि रियाचा काही संबंध आहे की नाही याची तपासणी ईडी आणि सीबीआय करणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!