उमापूर, दि.21 (लोकाशा न्युज) : चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर फाट्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे साडे तीन वाजता तीन हायवा ताब्यात घेतल्या होत्या. पथकात पाच कर्मचारी असल्याने पोलिसांनी सुरुवातीला पकडलेले हायवा चकलांबा पोलिस ठाण्यात कारवाईसाठी तीन पोलिसांसोबत पाठवले. मात्र चकलांबा फाट्याजवळ हायवा पोहचताच हायवा मालकाने स्कॉर्पिओ गाडी आडवी लावत हायवामधील तीन पोलिस कर्मचार्यांना धक्काबुक्की करून तो हायवा पळवून नेल्याची घटना दहा दिवसापूर्वी घडली होती. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात मालकासह हायवा चालक आणि अन्य चार लोकांवर कलम ३५३ सह वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींना न्यायालयीन कोठडी मीळाल्यानंतर कारागृहातील विलगीकरन वॉर्डात दाखल करण्याआगोदर त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. सदर आरोपी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात चकलांबा ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी वीस जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यामध्ये सात जणांचे रीपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.