देश विदेश

तुम्हाला, पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले नाहीत, अशी करा तक्रार

मुंबई, दि.16 (लोकाशा न्युज) ः नरेंद्र मोदी यांनी देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17100 कोटी रुपयांचा  सन्मान योजनेचा सहावा हप्ता भरला आहे. जर तुमचे नाव या योजनेसाठी रजिस्टर असेल आणि जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर खाली सांगितलेल्या पद्धतीने तक्रार दाखल करू शकता. PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचे 3 हप्ते पाठविले जातात. अशाप्रकारे 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतात. काही  या योजनेत आहेत परंतू काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना हे पैसे मिळत नाहीत. असे लोक सरकारने दिलेल्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवू शकतात. शेतकरी पीएम किसान सम्मान निधि योजनेची (PM Kisan Samman Nidhi Yojana)  हेल्पलाईन (PM-Kisan Helpline No. 155261) किंवा 1800115526 (Toll Free) किंवा 011-23381092 वर तक्रार करू शकता. यासह ई-मेल आयडी ([email protected]) वरही तक्रार करता येते. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!