बीड

पंकजाताई मुंडेंसाठी बीडमध्ये प्रज्ञावंत सरसावले, माझ्या विकास कामांचे रेकॉर्ड समोर ठेवून मला भरघोस मतांनी संसदेत पाठवा, प्रज्ञावंतांच्या मेळाव्यात महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचे आवाहन, जोरदार पावसानंतरही मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद

बीड | दिनांक १७।
मी राजकारणात कधीही कुठला भेदभाव केला नाही. तुम्हीही मतदार म्हणून करणार नाहीत याची खात्री आहे.उमेदवार म्हणून आपणास पसंत आहे, त्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहात काम करण्याची संधी मला द्या. संसदेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना बीड जिल्ह्यात येणाऱ्या पाच वर्षात उद्योग व्यवयाय आणून 10 हजार रोजगार उपलब्ध करेल. तसेच बीडमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणेल. याबरोबरच जिल्ह्यात मोठे मेडिकल कॉलेजला मंजुरी आणतांनाच जिल्हा दुष्काळ मुक्त करण्यासाठी काम करणार आहे. त्यामुळे मतदार म्हणून विकासाच्या कामांना आपले भरीव योगदान देण्यासाठी तुमचे मतरुपी सत्पात्री दान माझ्या पदरात टाका असे आवाहन भाजप महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले. माझ्या मंत्रिपदाच्या काळातील विकास कामांचे रेकॉर्ड समोर ठेवून तुम्ही मला भरघोस मतांनी निवडून द्या असेही त्या म्हणाल्या.

भाजप महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज सूर्या लॉन्स येथे प्रज्ञावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
व्यासपीठावर उमेदवार आ. सतीश चव्हाण, माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर, दिपक घुमरे, भाऊसाहेब नाटकर, मुजीब पठाण आदी उपस्थित होते.

यावेळी पंकजाताई मुंडे म्हणाल्या, आपण समाजाचे खरे मार्गदर्शक आहात. सर्वजण सुशिक्षित आहेत. उमेदवार म्हणून माझ्या पक्षाने माझी जी निवड केली आहे, ती सार्थ करण्यासाठी मला प्रचंड मताधिक्य देऊन निवडून द्या. माझ्यासाठी आपले योगदान खूप महत्त्वाचे आहे, ते तुम्ही द्या. आपला उमेदवार म्हणून मी संसदेत बीड जिल्ह्याच्या विकासाचे भरीव काम करून दाखवेल. मी कायम तुमच्यासोबत असेन, तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे सांगत पंकजाताई मुंडे यांनी उमेदवार का आणि कसा निवडावा यावर उपस्थितांशी संवाद साधला.

मी दिसणारी कामे केली

मी मंत्री असताना कसे काम केले आहे. विकासाचे किती प्रश्नमार्गी लावले हे सर्वांना माहिती आहे, कारण मी राज्य मंत्रिमंडळात मंत्री असताना केलेले काम दिसणारे आहे तरीही माझा सर्वांशी असलेला व्यवहार आणि उमेदवार म्हणून किती व्यापकतेने प्रश्न सोडवून विकासकामे करू शकते हे समोर ठेऊन तुम्ही मला मतदान करावे असे आवाहनही यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केले.

पुढे त्या म्हणाल्या, उमेदवाराला निवडून आल्यानंतर त्याच्यासह मतदार संघातील मतदारांचे पण चांगले भविष्य असावे लागते. मतदारांचे हे चांगले भवितव्य आणण्यासाठी मला उमेदवार म्हणून तुम्ही मतदान करावे. जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती असो की जिल्ह्यातील ग्रामपंचायती पंचायत समित्यांचे नवीन इमारत बांधकामाचे कामे असो हे सर्व मागच्या काळात आपण मार्गी लावली आहेत. या सर्व योजना आणि निर्णय घेताना कोणताही भेदभाव केला नाही.आरक्षणाचा मुद्द्यावर निवडणूक नेऊ नका असं त्या म्हणाल्या.

तुमचे मत मी वाया जाऊ देणार नाही

मी सत्तेत असताना कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही असे काम केले आहे. शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी काम केलेले आहे.यापूर्वी ग्रामविकास मंत्री असताना राज्यात ऑनलाइन शिक्षक बदलीचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरला.यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना फायदा झाला. माझी भूमिका कायम विकासासोबत आहे. त्यामुळे तुमचे मत मी वाया जाऊ देणार नाही अशी ग्वाही या प्रसंगी पंकजाताई मुंडे यांनी दिली.

पंकजाताईंमध्ये विकास करण्याची धमक, आ.सोळंके, आ. चव्हाण

राज्य शासनाच्या योजना केंद्र सरकारच्या सहकार्याने राबवण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन आ.प्रकाश सोळंके, आ. सतीश चव्हाण यांनी यावेळी केले.पंकजाताई मुंडे यांचेकडे तत्परतेने विकास कामे करण्याची हातोटी आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जागृत मतदार म्हणून ही निवडणूक आपण सर्वांनी आपण स्वतः उमेदवार असल्याचे समजून पंकजाताई मुंडे यांना मतदान करावे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने कणखर नेता देशाला पुन्हा हवा आहे त्यासाठी बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडून देणे गरजेचे आहे. आज मोदींनी जगात भारताचा दबदबा निर्माण केला आहे असे ते म्हणाले.

माजी आमदार अमरसिंह पंडित, युवा नेते योगेश क्षीरसागर आदींची समयोचित भाषणे झाली. दरम्यान बुधवारी दुपारपासून बीड शहर व परिसरात अवकाळी पाऊस सुरू होता त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले मात्र पंकजाताईंच्या या मेळाव्याला प्रज्ञावंतांनी प्रचंड संख्येने उपस्थिती दर्शवत हा मेळावा यशस्वी केला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!