बीड

शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला बजरंग सोनवणे शेतकऱ्यांच्या बांधावर, धारूर तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची केली पाहणी

लोकाशा न्यूज़ 

बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी धारूर तालुक्यातील गारपीटग्रस्त भागात बांधावर जाऊन पाहणी करीत शेतकऱ्याचे सांत्वन केले. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील सोनवणे यांनी केली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे हे १४ एप्रिल रोजी धारूर तालुक्यात गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. मागील दोन दिवसापूर्वी प्रचंड गारपिट होऊन शेतातील उभ्या पिकांसह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बजरंग सोनवणे हे प्रचारातून वेळ काढून थेट बांधावर पोहचले. यावेळी गारपीटग्रस्त शेतकरी बांधवानी आपल्या झालेल्या नुकसानीची व्यथा सोनवणे यांना सांगत मदत मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली झालेले नुकसान पाहून व्यथित झालेल्या बजरंग बप्पानी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी  यांनी केली आहे.

        यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवराज लगड़,ज्ञानेश्वर आंधळे , शिवसेना उबाठा गटाचे तालुका अध्यक्ष विनायक मुळे , आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष धम्मपाल डावरे , मा ह चे तालुकाध्यक्ष विष्णूजी मुजमुले यांची उपस्थिती होती

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!