गेवराई

घराला भिषण आग लागून दिडशे क्विंटल कापूस जळून खाक ; घराचेही मोठे नुकसान, गेवराई तालुक्यातील रामपूरी येथील घटना



…………………..
गेवराई: लोकाशा न्युज
घराला अचानक आग लागल्याने घरातील साहित्य व शेतातील जवळपास शंभर ते दिडशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली असून घरातील जीवनाशी वस्तूचे साहित्य जीवनाशक वस्तू जुळवून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समजते आहे. आग विझवण्यासाठी गेवराईवरून आग्नि शामक दलाच्या गाड्याला पाचारण करण्यात आले होते.अग्निशामक दलाच्या गाड्या येईपर्यंत. घराचे व साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की तालुक्यातील रामपूरी येथील सरपंच जगदीश मस्के यांच्या घराला बुधवार दि.३ एप्रिल रोजी पहाटे पाचच्या सुमारास अचानक आग लागल्याने जवळपास दीडशे ते दोनशे क्विंटल कापूस जळून खाक, तर महत्वाचे कागज पत्र, घराचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे माहिती समोर येत आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या गेवराईहुन येई पर्यंत मोठ्या प्रमाणात घरातील साहित्य, कापूस जीवनाशक वस्तू जळून खाक होवून राख रांगोळी झाली होती गावकऱ्यांनी व अग्निशामक दलाल च्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने उग्र रुप धारण केल्याने उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नाही. दरम्यान आग कशामुळे लागली याचे कारण मात्र उशिरापर्यंत समजले नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!