बीड

नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाकडून बुस्टर, माहिला आणि नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी पुर्णपणे प्रयत्न करावेत, मयतांची नावे यादीतून कायमस्वरूपी वगळावित- जिल्हाधिकार्‍यांचे आदेश


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हयातील महिला आणि नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी गुरूवारी मतदार दिनाच्या कार्यक्रमाला व्यक्त केली.
बीड जिल्हा प्रशासनाच्यावतीने गुरूवारी जिल्हा नियोजन सभागृहात राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. त्रीगूण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी, कविता जाधव, संगीता घागरे, तहसीलदार ओंमकार देशमुख, सुहास हजारे, नरेंद्र कुलकर्णी मंचावर उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, बीड जिल्ह्यात लोकसंख्या जनगणनेनुसार महिलांची संख्या अधिक आहे. मात्र, मतदार यादीत ती कमी दिसुन आली. तसेच 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्याही पाहीजे तेवढी दिसून आली नाही. विद्यार्थी गटात मोडले जाणारे नवमतदार हे अभ्यासासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी महानगरात जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्या पालकास पटवून त्यांची नावे यादीत समाविष्ट करावीत.  यासह जिल्हयातील मयत व्यक्तींची  नावे मतदार यादीतून वगळण्याचा कटाक्षाने प्रयत्न करावा, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या. दरवर्षी  25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिवस’ म्हणुन साजरा केला जातो. मतदानाच्या दिवशी  मतदारांनी मतदानाचा हक्क  बजावुन या देशाचे विधाता बनण्याची संधी या निमित्ताने आपल्याला लोकशाहीने दिली असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. त्रीगूण कुलकर्णी यावेळी म्हणाले. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त उपस्थित सर्वांना शपथ देण्यात आली. ही शपथ किती जाणीवपुर्वक तयार केली गेली असल्याचे त्यांनी यावेळी विवेचन केले. निवडणूकीचा हक्क बजावतांना धर्म, वंश, जात समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करावे असा संदेश प्रतिज्ञाच्या माध्यमातून देण्यात आला. याचे पालन केल्यास लोकशाही अधिक सदृढ होईल, असे श्री. कुलकर्णी म्हणाले. निवासी उपजिल्हाधिकारी तथा उप निवडणूक अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतेवेळी बदलती मतदान नोंदणीची पद्धतीची माहिती दिली. व्होटर हेल्प लॉईन प  चा वापर करून यादीमध्ये नाव कमाविष्ट करू शकता, वगळू शकता, दूरूस्ती करू शकता अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.  निवडणूकीच्या कामात बीएलओ,  डेटा ऑपरेटर यांनी केलेले काम कौतुकासपद असून यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.  जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. कुलकर्णी , निवासी उपजिल्हाधिकारी श्री स्वामी यांच्या हस्ते नवमतदार , बीएलओ, डेटा ऑपरेटर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  जिल्हा परिषदेचे  प्राथमिक पदवीधर शिक्षक अमजद शेख यांनी केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!