बीड

निलम बाफना चौकशीच्या फेर्‍यात !चौकशीसाठी हजर रहा, एसीबीने बजावली नोटीस, लाचखोर जाधवांसह अन्य एकास सहा दिवसांची पोलिस कोठडी


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : माजलगाव उपविभागीय कार्यालयातील जातप्रमाणपत्र विभागाच्या लिपिकासह खासगी एजंटास 30 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी बीडच्या एसीबीने रंगेहाथ पकडले होते. यातील दोन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. याचवेळी न्यायालयाने उपविभागीय अधिकारी निलम बाफना यांचाही यात सहभाग आहे की नाही? हे तत्काळ निश्चित करा, अशा सूचना एसीबीच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत परंतु बाफना फरार असल्याने एसीबीने कार्यालयास पत्र दिले आहे. त्यामुळे लाचेच्या प्रकरणात बाफनाहीदेखील अडकण्याची दाट शक्यता आहे. कारण त्या याप्रकरणात आरोपी होण्याची दाट शक्यता आहे. याअनुषंगानेच बीड एसीबीने त्यांना हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.

लाचखोर जाधवास सहा
दिवसांची कोठडी
दरम्यान, यातील जाधव व शेख या दोन्ही आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली. सोबतच माजलगावच्या एसडीओ नीलम बाफना यांचा यात कसा सहभाग आहे? हे तत्काळ निश्चित करा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्याप्रमाणे एसीबीने बाफना यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे पत्रही तयार केले. परंतु त्या फरार असल्याने त्यांच्याकडे हे पत्र पोहचले नाही. त्यामुळे हे पत्र त्यांच्या कार्यालयात देण्यात आले आहे. एसीबीकडून आता बाफना यांच्याबाबत कसा तपास केला जातो? याकडेही लक्ष लागले आहे.

दोन दिवसात बाफनांनी चौकशीसाठी
हजर रहावे – शंकर शिंदे
दोन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे तसेच विभागप्रमुख असलेल्या एसडीओ नीलम बाफना यांचा यात कसा सहभाग आहे? हे निश्चित करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्याप्रमाणे पत्र तयार केले, परंतु त्या हजर नसल्याने हे पत्र कार्यालयात दिले आहे. दोन दिवसांत चौकशीसाठी न आल्यास जिल्हाधिकारी यांना बाफना यांना हजर राहण्याबाबत आदेशित करावे, असे पत्र दिले जाणार असल्याचे एसीबीचे डीवायएसपी शंकर शिंदे यांनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!