बीड

बीडमधील त्या कार्यालयाचे कामकाज चालणार न्यायालयाच्या जुन्या ईमारतीतून !जिल्हाधिकारी अन् मध्यवर्ती प्रशासकिय ईमारतीमधील कार्यालये कलेक्टरांनी केली स्थलांतरीत


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : येथील जिल्हाधिकारी अन् मध्यवर्ती प्रशासकिय ईमारतीमधील कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात येथील न्यायालयाच्या जुन्या ईमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात येत आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून या ईमारतीमधून कामकाज करावे, असेे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी  संबंधित विभाग प्रमुखांना केले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकिय ईमारतीच्या जागी नविन ईमारत बांधकामास शासनाची मंजूरी प्राप्त असून त्याअनुषंगाने निवीदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जुन्या इमारतीत अस्तित्वात असलेली विविध कार्यालये काही कालावधीकरीता स्थलांतरीत करणे अवश्यक आहे. मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मध्यवर्ती प्रशासकिय इमारतमधील कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मध्यवर्ती प्रशाकिय इमारत येथील कार्यालयाच्या परिसरातील कार्यालये जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथील जुन्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी पत्र काढले आहे. त्यानुसार न्यायालयाच्या जुन्या ईमारतीमधील तळ मजल्यातील हॉल क्र. 1,2,3,4,5, 6मध्ये जिल्हा कोषागार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग बीड तळ मजल्यातील हॉल क्र. 9,10, 11, उपजिल्हाधिकारी भुसंपादन (जा.प्र) बीड तळ मजल्यातील हॉल क्र.12,13,14, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय पहिल्या मजल्यावरील हॉल क्र.101,102,103,104, उपजिल्हाधिकारी भुसंपादन (ल.पा). बीड हॉल क्र. 105,106 आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड हे पहिल्या मजल्यावरील हॉल क्र. 107,108,109,110,111,112 मध्ये स्थलांतरीत करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयात  इमारतीमध्ये स्थलांतरीत कार्यालयांनी मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी लावून दिलेल्या अटीचे तंतोतंत पालन करावे, असे पत्र जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!