बीड

एसपींनी दहा पोलिस अधीकार्‍यांवर दिली नव्या ठाण्यांची जबाबदारी, बीड शहर शितलकुमार बल्लाळांकडे, केतन राठोडांकडे माजलगाव शहर, मुदीराजांकडे पेठ बीड, बंटेवाडांकडे बीड ग्रामीणची जबाबदारी


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पोलीस दलात बदल्यांचे सत्र पार पडल्यानंतर आता अधिकार्‍यांना नवीन ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील दहा अधिकार्‍यांना पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
शिवाजी बंटेवाड यांना माजलगाव ग्रामीणमधून बीड ग्रामीण, बालक कोळी यांना मानव संसाधनमधून माजलगाव ग्रामीण, शीतलकुमार बल्लाळ माजलगाव शहरमधून बीड शहर, केतन राठोड शिवाजीनगर वरून माजलगाव शहर, अशोक मुदीराज वाहतूक शाखेतून पेठ बीड, गोरकनाथ दहिफळे परळी शहरवरून सिरसाळा, भार्गव सपकाळ पाटोदावरून अंमळनेर, मधुसूदन घुगे शहर वाहतूक शाखेतून पिंपळनेर, चंद्रकांत गोसावी अंमळनेरवरून नेकनूर, सुभाष सानप आर्थिक गुन्हे शाखेतून जिल्हा वाहतूक शाखेत आले आहेत. सध्या पाच पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इतर अधिकार्‍यांना लवकरच नवीन ठिकाणी नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!