बीड

लोकनेते मुंडे साहेबांनी पाहिलेले स्वप्न वास्तवात आणण्यासाठी मी सदैव रणांगणात – पंकजाताई, भगवान भक्तीगडावर दसरा सिमोलंगणासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसागर उसळला, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सोन्यासारखी माणसे दिली- खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे

पाटोदा : संजय सानप

‘ उन्हातान्हात राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही लाखोंच्या संख्येने आलात.. तुमच्यासमोर मी नतमस्तक होते.. असे सांगत शिवशक्ती भव्यते कडून दिव्यते कडे गेली.. आपण आयुष्यभर संत भगवान बाबांच्या आशीर्वाद आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेला स्वाभिमान आणि संस्काराचा मंत्र जपण्यासाठी अखंड रस्त्यावर राहू.. असा शब्द देत आपला आवाज कोणी दाबू शकणार नाही! इथे सर्व समाजाचे लोक आले आहेत. ऊसतोड कामगारांना न्याय दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसून तुम्ही उन्हात तळपत असताना सत्तेत बसणारे मुंडेंचे रक्त असू शकत नाही..!’ असे भावनिक अन् सडेतोड स्पष्ट बोल सुनावत तुमच्यासाठी लोकनेते मुंडे साहेबांनी पाहिलेले स्वप्न वास्तवात आणण्यासाठी मी सदैव रणांगणाथ उतरले आहे!!’ असा रोखठोक इशारा भाजपाच्या राष्ट्रीय महासचिव, माजी मंत्री तथा गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पंकजाताई मुंडे यांनी लाखो जनसागरांच्या विराट जन्मसमुदायाला दसऱ्याच्या शुभेच्छा देत संत भगवान बाबांच्या पवित्र मंचावरून दिला.

दसरा मेळाव्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा जपत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा भगवानगडावरून भगवान भक्ती गडावर आल्यानंतर ही परंपरा पंकजाताई मुंडे यांनी तितक्याच जबाबदारीने पार पाडली. आजच्या दसरा मेळाव्याच्या मंचावरून सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावरच्या मंचावर संत भगवान बाबांच्या मूर्तीची विधिवत पूजा केल्यानंतर लाखो जनसागराला त्या संबोधित करीत होत्या. मंचावर खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, महादेव जानकर, आमदार मुंदडा, आमदार मेघनाताई बोर्डीकर, माजी आमदार भीमराव धोंडे, शिवाजी कर्डिले, प्रकाश मामा महाजन, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आदी सह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

पंकजाताई मुंडे त्यांनी आपल्या मुंडे स्टाईलने विराट जनसमुदायाला पहिल्याच वाक्यापासून प्रेरित केले.. आणि समोरील उत्स्फूर्त जनसागरातून ‘गोपीनाथ मुंडे अमर रहे..!’ च्या घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला. त्या म्हणाल्या, साखर कारखान्यावर तपासणी झाल्यानंतर तुम्ही कोटी रुपये जमा केले. तुम्ही उन्हात तर आम्ही उन्हात; परंतु तुम्ही उन्हात असताना सत्तेत बसणारे मुंडेंचे रक्त असू शकत नाही असा धगधगता इशारा देत इथे सर्व समाजाचे लोक आहेत. इथे शेतकरी सुखी नाही. शेतमजुरांना काम नाही. ऊसतोड कामगारांना न्याय दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी अस्वस्त केले.

मध्यंतरी भाषणा दरम्यान माइक बंद पडला. तो खासदार डॉ. सुजय विखे आणि यशश्री मुंडे यांनी तो बदलून दिला. हा धागा पकडत पंकजाताई मुंडे यांनी तुमची एवढी प्रचंड शक्ती सोबत असेल तर आपला आवाज कोणी दाबू शकणार नाही.. असा गर्भित इशारा देताच समोरील जनसागरातुन पंकजाताई मुंडे तुम आगे बढो च्या घोषणांनी अवघा आसमंत एक झाला!

मी तुम्हाला स्वाभिमान देऊ शकते. कारण लोकनेते गोपीनाथराव मुंडेंनी सांगितले होते..’ पंकजा तुझ्या पदरात जनता टाकतोय, तु त्यांची काळजी घे. तुम्ही कोटी रुपये देऊ केले पण मी ते घेणार नाही, फक्त तुमचा आशीर्वाद घेणार. मुला इतकीच जनता ही माझी जबाबदारी असून परळी इतकेच मी पाथर्डीला माझे समजते. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, असा विनम्र भाव दाखवत त्यांनी माझ्यात नीतिमत्ता आहे. पदे नसली तरी निष्ठा काय असते हे समोरील जनसागरावरून समजते. तुम्हाला उन्हात ठेवणाऱ्यांचे घर उन्हात बांधल्या शिवाय राहणार नाही. शिव शंकर भोळा असतो पण त्यालाही तिसरा डोळा असतो हे लक्षात ठेवावे. जिंकण्यासाठी तुम्ही निष्ठा गहाण ठेवणारी माणसे नाहीत. मी कर्जदार त्यांची नाही, तुमची आहे. आता बदलाची परिस्थिती निर्माण झालीय. मी तुमच्या भावना ऐकतेय, तुमची मी ताई नाही आई आहे. तुमच्या ज्या वेदना आहेत त्याच माझ्या आहेत. तुम्ही सांगितले तर ऊस तोडीन पण स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. ऊसतोड कामगार महामंडळाला न्याय देऊ शकले नाही, ही खंत व्यक्त करून त्यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक सरकार बनवू शकले नाही अशी जाहीर खंत व्यक्त करून आता बनवूच नका.. जाती धर्माच्या भिंती संपवा हे मुंडेंचे स्वप्न प्रत्यक्षात आणू. गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना ‘गोली का जवाब गोली से दो..!’ असा पोलिसांना आदेश दिला होता. त्याची आठवण करून देत तुमच्यासाठी मुंडेंनी पाहिलेले स्वप्न वास्तवात आणण्यासाठी मी सदैव रणांगणात उतरले आहे. तुमच्यासाठी आता संपूर्ण जीवन समर्पित करणार आहे असा जाहीर विश्वास त्यांनी लाखो जनसागराला दिला आणि प्रचंड टाळ्यांच्या गजराने प्रतिसाद मिळाला.

खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांनी आपल्या प्रस्ताविक पर भाषणात आलेल्या सर्वांचे स्वागत करून दसऱ्याच्या शुभेच्छा दिला. त्या म्हणाल्या, लोकनेते मुंडेंनी सोन्यासारखी माणसे दिली. आम्ही लाखोंचा जनसागर कमावला. तुम्ही जनता ही संघर्षाचे प्रतीक आहे. स्वाभिमान हा आपल्या सर्वांना भगवान बाबांनी दिला. ताईवर संकट येताच तुम्ही लाखो रुपये जमा केले. ताई ज्योती प्रमाणे भासतात. या ज्योती मध्ये सेवा करण्याची ताकद आहे. ताईंची ज्योत आणि तुमची शक्ती भविष्यात इतिहास घडवेल असे सांगून विजयादशमी निमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या दसरा मेळाव्याच्या भव्य मंचावर खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे, यशश्री मुंडे, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार सुरेश आण्णा धस, आमदार मेघनाताई बोर्डीकर, आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार भीमराव धोंडे, प्रकाश मामा महाजन, ह भ प डॉ. पानेगावकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, ह भ प राधाताई सानप, सुवर्णाताई लांबरुड, सतीश आबा शिंदे, रमेश आडसकर, गोरख रसाळ, राजेंद्र मस्के, माऊली जरांगे,सुधीर घुमरे,विजय गोल्हार, अजय दादा धोंडे, सर्जेराव तात्या तांदळे, मुरलीधर ढाकणे, अरुण मुंडे, देविदास शेंडगे आदीसह विविध क्षेत्रातील विविध ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि भाविक भक्त उपस्थित होते.

चौकटीत( क्षणचित्रे )

भगवान भक्ती गड ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष इंजिनियर संदेश सानप आणि सहकारी यांनी सत्कार केला.

गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर संघटनेच्या वतीने तसेच आमदार सुरेश आण्णा धस, रमेश आडसकर व इतरांनी तलवार देऊन सत्कार केला.

देविदास शेंडगे यांनी घोंगडी देऊन विशेष सत्कार केला.

रामेश्वर गोरे व सहकारी यांनी फळे भाजीची टोपली आणि विळा देऊन सत्कार केला.

मुस्लिम बांधवांच्या वतीने सलीम जहागीर आणि सहकार यांनी सत्कार केला.

सावरगाव घाट गावकऱ्यांच्या वतीने अकरा जेसीबीतुन फुलांची उधळण करून विशेष स्वागत करण्यात आले.

नरेंद्र जावळे आणि सहकाऱ्यांनी स्वागत केले.

बंजारा समाजाच्या वतीने भूषण पवार आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

ना भूतो न भविष्यती असा हा दसरा मेळावा झाला.. विचारांचे शिमोलंगण आणि परिवर्तनांचा ध्वज फडकवला.

पंकजाताईंनी ध्यान मंदिरात संत भगवान बाबांची विधिवत पूजा केली आणि एक वाजून 51 मिनिटांनी मंचावर आगमन झाले.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उत्स्फूर्त कार्यकर्त्यांच्या आवेश पूर्ण घोषणा पाहून पंकजाताई अक्षरशः भारावल्या होत्या.

उत्साह असांडून असताना मुंडे आणि भगवान बाबांच्या घोषणांनी उपस्थित त्यांच्या अंगावर शहारे आले.

राज्यभरातून संत भगवान बाबा आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे भक्त उपस्थित होते.

बीड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

आरोग्य विभागाने आपले कर्तव्य पार पाडले.

राज्यभरातून माध्यम क्षेत्रांनी यावेळी उपस्थिती लावली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!