बीड

कुटे ग्रुप सदैव गरिबांच्या सेवेत, दसऱ्यानिमित्त अनाथ, निराधारांना कपड्यासह मिठाईचे केले वाटप


बीड : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या कुटे ग्रुपने यावर्षीचा दसरा अनाथ आणि निराधारण बरोबर शहरासह परिसरात असलेल्या वृद्धाश्रम अनाथालय येथे दसऱ्यानिमित्त नवीन कपड्यासह मिठाईचे वाटप करण्यात आले .सुरेशराव कुटे अर्चनाताई कुटे आर्यन कुटे यांनी हा उपक्रम राबविला.
शहरातील सामाजिक सांस्कृतिक धार्मिक अशा कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या कुटे ग्रुपने यावर्षी दसऱ्यानिमित्त शहरातील निराधार नागरिकांना नवे कपडे आणि मिठाचे वाटप केले तसेच पसायदान सेवा प्रकल्प, शिरूर तालुक्यातील आजोळ प्रकल्पातील आजी-आजोबांना दसऱ्यानिमित्त साडीचोळी सह आजोबांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले तसेच पसायदान प्रकल्पातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दसऱ्यानिमित्त नवीन कपडे आणि मिठाईचे वाटप करून सगळ्या वेगळ्या पद्धतीने दसऱ्याचा उत्सव साजरा केला. कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेशराव कुटे मॅनेजिंग डायरेक्टर अर्चनाताई कुटे आर्यन कुठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला दसऱ्यानिमित्त नवीन कपडे आणि मिठाईचे वाटप करताना या निराधार आणि अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य निर्माण झाले होते अडचणीच्या काळातही कुटे ग्रुपने आपल्या सामाजिक दायित्वाचे कार्य अखंडपणे सुरू ठेवल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!