Uncategorized

आता डॉ. संजय कदम बीडचे नवे तालुका आरोग्य अधिकारी, सहसंचालकांनी काढले बदलीचे आदेश,उद्या बीडला होणार रूजू


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : शनिवारी डॉ. संजय रामराव कदम यांची प्रशासकिय बदली करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे आता बीड तालुका आरोग्य अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्तालयाचे सहसंचालक तुळशीदास सोळंके यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार ते उद्या दि. 12 जून रोजी बीडला रूजू होणार आहेत.
मागच्या 25 वर्षांपासून डॉ. संजय कदम हे आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. एक सक्षम आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ते आपले कर्तव्य चोखपणे निभावतात, कोविडच्या काळात तर त्यांच्या सेवेमुळे अनेकांचे प्राणही वाचले होते, त्यांनी यापुर्वी तालखेड, गंगामसला, तलवाडा, नेकनूर, लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी म्हणून कर्तव्य बजावलेले आहे. त्यानंतर त्यांच्याकडे बीड तालुका आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती, पुढे त्यांची गेवराई येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली, गेवराई तालुक्यात ते मागील आकरा वर्षांपासून सेवा करत होते, कामात असलेली गती आणि त्यांचा प्रामाणिकपणा लक्षात घेवून पुन्हा एखदा त्यांच्याकडे बीड तालुका आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात शनिवारी आरोग्य सेवा आयुक्तालयाचे सहसंचालक तुळशीदास सोळंके यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार ते उद्या दि. 12 जून रोजी बीडला रूजू होणार आहेत. दरम्यान त्यांच्या या नव्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!