Uncategorized

बाभळगावात जलजीवनच्या पाईपलाईनचे काम बोगस, पाईपलाईन उखलून ती पुन्हा टाका, काम दर्जेदार न केल्यास ठेकेदारास काळ्या यादीत टाकणार, देयकही रोखणार, वाप्कोसने ठेकेदाराला बजावली नोटीस


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले पाईपलाईनचे काम बोगस असल्याचे वाप्कोस कंपनीच्या पाहणी दरम्यान निदर्शनास आले आहे. त्यामुळे लक्षद्विप भागवान गाडे या ठेकेदारास केलेले काम काढून चांगल्या प्रतीचे करावे अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे आपल्याला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात येईल असे दिलेल्या नोतिसत म्हटले आहे.
माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथे मागील काही दिवसापासून जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना होत आहे. या योजनेची काम सुरू असून पाईपलाईन हातरण्यात येत आहे, हे सुरू असलेले पाईपलाईनचे काम बोगस असल्याची तक्रार विलास लाटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे केली होती, या तक्रारीची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या योजनेवर नियंत्रण असलेल्या वाप्कोस कंपनीला पाईपलाईन कामाची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते या आदेशाचे पालन करत वाप्कोस कंपनीने चारशे मीटर पाईपलाईनची पाहणी केली असता ही पाईपलाईन 20 सेंटी मीटर खोलीवर टाकण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे सदर काम हे निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे हे सुरू असलेले बोगस काम तात्काळ बंद करून सदरील पाईपलाईन काढून टाकून अंदाजपत्रकावर दिलेल्या खोलीवर टाकण्यात यावी, अन्यथा आपल्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल व योग्य ती कार्यवाही होईपर्यंत कोणतेही देयक अदा केले जाणार नाही, असे लक्षव्दीप भगवान गाडे या ठेकेदारास दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला चांगलीच चपराक बसली असून पाईपलाईनचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!