देश विदेश बीड

देशभरात बकरी ईदचा उत्साह

नवी दिल्ली – देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम बांधवांनी  मशिदीमध्ये नमाज पठण करत आहेत. दरम्यान, मुस्लिम मान्यतेनुसार हा सण हजरत इब्राहिम यांच्या कुर्बाणीसाठी साजरा करण्यात येतो. आज या पवित्र प्रसंगी काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ईदचा उत्साह दिसून येत आहे. मशिद आणि ईदगाहमध्ये जावून मुस्लिम बांधव नमाज पठण करत आहेत

दरम्यान, मुस्लिम बांधवाच्या वतीने बकरी ईद साजरी केली जाणार आहे. यावर्षी करोना विषाणूच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करावी. नागरिकांनी नमाज मस्जिद किंवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता आपल्या घऱीच करावी. सद्यस्थितीत जनावरांचे बाजार बंद आहेत. त्यामुळे जनावरांची खरेदी ऑनलाइन करावी. नागरिकांनी शक्‍यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित क्षेत्रात सध्या लागू असलेले निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये बकरी ईदनिमित्त नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देता येणार नाही. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता नागरिकांनी बकरी ईद सण साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!