Uncategorized

आ.संदीपभैय्या क्षीरसागर पाणीप्रश्नावर आक्रमक,मंजूर योजनेची वीजजोडणी करण्याची विधीमंडळात मागणी

बीड (प्रतिनिधी):- शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आ.संदीपभैय्या क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून आतोनात प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने आ.क्षीरसागर यांनी बीड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी, स्वतः विशेष लक्ष घालून अमृत योजनेचे रखडलेले काम पूर्ण करुन घेतले.परंतू नगर परीषदेकडे थकलेल्या वीजबीलामुळे अद्यापपर्यंत या योजनेसाठी वीजजोडणी करण्यात आली नसून केवळ यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून शहरात नियमीत पाणी पुरवठा करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांनी गुरुवारी (दि.24) रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.वारंवार मागण्या करून देखील वीजजोडणी होत नसल्याने विधीमंडळात आ.संदीपभैय्या आक्रमक झाल्याचे दिसून आले.
                सध्या बीड शहरामध्ये पिण्याची तसेच सांडपाण्याची गंभीर समस्या जाणवत आहे. तब्बल 15-20 दिवसातून एकदा शहराला पाणी मिळत आहे. यामध्ये विशेष बाब अशी आहे की, माजलगाव धरणासह काही प्रमाणात पाली येथील बिंदूसरा प्रकल्पातून बीड शहराला पाणीपुरवठा होतो. या दोन्ही ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतू केवळ यासाठी परिपुर्ण यंत्रणा उपलब्ध नसल्याने मुबलक पाणीसाठा असूनही त्याचा उपयोग शहरातील नागरिकांसाठी होत नाही. पाण्याचे गंभीर प्रश्नाला शहरवासियांना कायमच तोंड द्यावे लागते. त्यामुळे आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्न करून बीड शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचे रखडलेले काम पूर्ण करून घेतले होते. परंतू बीड नगर परिषदेच्या मागील सत्ताधार्‍यांच्या गलथान कारभाराने नगर परिषदेकडे तब्बल 12 कोटी रूपये इतके वीज बील तर १३ कोटी रुपये इतके वीजबीलावरचे व्याज अशी एकूण २५ कोटी रुपये रक्कम थकलेली आहे.त्यामुळे या योजनेला महावितरणकडून वीज जोडणी करण्यात येत नाही. योजना मंजूर असूनही बीड शहराला पाणी मिळत नाही.त्यामुळे आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी वेळोवेळी उर्जा राज्यमंत्री तसेच संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. परंतू अद्यापपर्यंतही वीज जोडणी झालेली नाही. केवळ वीज जोडणीमुळे शहराला पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे गुरूवार दि.24 मार्च रोजी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी अधिवेशनात नगर परिषदेकडे थकलेल्या वीज बिलाचे व्याज म्हणजेच १३ कोटी रुपये माफ करावे,थकलेल्या वीजबीलाची मुद्दल रक्कम आम्ही लवकरच टप्प्याटप्याने भरू असे सांगितले. या योजनेसाठी लवकरात लवकर वीज जोडणी करण्यात यावी आणि शहरवासियांचा गंभीर आणि जिव्हाळ्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा अशी मागणी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!