बीड माजलगाव

अखेर ‘ती’ वानरे जेरबंद; मागील आठ दिवसांपासून घातला होता गोंधळ : नागपूर वन विभागाच्या पथकाने दोन तासातच पकडली वानरे

माजलगाव : तालुक्यातील या ठिकाणी आपल्या पिलाला कुत्र्यांनी जीवे मारण्याच्या प्रकारातून वानराने बदल्याच्या भावनेपोटी मागील आठ ते 10 दिवसांपासून कुत्र्याच्या पाठोपाठ त्यांच्या पिल्लांना आणि स्थानिक रहिवाशांना देखील त्रास देण्यास सुरू केले होते त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते अखेर वनविभागाने नागपूर येथील पथकाला पाचारण करून या वानरांना जेरबंद करण्यात आल्यामुळे लवूळ ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. वणारांमुळे विविध ठिकाणी उपद्व्यापाच्या बऱ्याच घटना घडल्याचे आपण ऐकत असतो मात्र त्याही पुढे जाऊन माजलगाव तालुक्यात लवूळ या ठिकाणी अजब घटना मागील काळात घडली एका वानराच्या पिलाला कुत्र्यांनी घेरून मारले त्यामुळे संतापलेल्या वानराने कुत्र्याच्या पिल्लांना बदल्याच्या भावनेने झाडावर नेऊन खाली फेकून देत मारण्याचा सपाटा सुरू केला यात अनेक कुत्र्यांची पिल्ले मारले गेली तसेच याला प्रतिकार करण्यास गेलेल्या नागरिकांवर देखील धावून जाण्याचे प्रकार सदर वानराने केले त्यात अनेक जण जखमी देखील झाले यामुळे गावात एकच भीतीचे वातावरण पसरले होते यावर धारूर येथील वनविभागाच्या कार्यालयाला कळविण्यात आल्यानंतर त्यांनी नागपूर येथील पथकास वानराला पकडण्यासाठी पाचारण केले. नागपूरच्या पथकाने दिनांक 18 रोजी सदर वानरांना सापळ्यात अडकवून जेरबंद केले त्यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत सुटकेचा श्वास सोडला..

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!