गेवराई

दोन सख्या बहिणींचा गोदावरीत बुडून मृत्यू ; राक्षसभुवन शनीचे येथील दुर्दैवी घटना

दोन सख्या बहिणींचा गोदावरीत बुडून मृत्यू ; राक्षसभुवन शनीचे येथील दुर्दैवी घटना गेवराई : प्रतिनिधी आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शनीचे राक्षसभुवन येथे शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली . या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . नेहा धर्मराज कोरडे ( वय ९ वर्ष ) व अमृता धर्मराज कोरडे ( वय ८ वर्ष ) असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत . घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिस ठाण्यात नवनिर्वाचित सहायक पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले . तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले . गेवराई तालुक्यात यापुर्वी देखील मिरगाव , संगमजळगाव येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मुलींचे गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेले आहे . त्यातच शनिवारी राक्षसभुवन याठिकाणी घडलेल्या या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!