बीड

सुर्डीच्या लेकीचे पालकत्व डी.एम, ने स्वीकारले

चिमुरडीला न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादी सोबत - संगीता तूपसागर

बीड- सुर्डी येथील घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे , सदरील घटनेने नराधम वृत्तीचा सर्वदूर निषेध होत असताना सदरील घटनेत सकारात्मक बातमी आली , जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी त्या मुलीचे पालकत्व स्वीकारल्याचे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षा संगीता तूपसागर यांनी कळवले आहे . जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपले पालकत्व सिद्ध केल्याचे तूपसागर यांनी पत्रकातून म्हटले आहे.
 राष्ट्रवादी जिल्हा महिला आघाडी कडून संगीता तूपसागर यांनी मुलीच्या पालकांची भेट घेतली , पालकांचे म्हणणे ऐकून घेतले व स्थळावरून थेट पालकमंत्री धनंजय मुंडे यांना संपर्क करण्यात आला . यावेळी परीस्थीती समजून घेताना मुलीच्या उपचारा सह लागेल ती मदत करणार असून येणाऱ्या काळात मुलीच्या पाठीशी आधार घेऊन उभा होणार असल्याचे सांगितले . शिक्षणाचा व लागणारा इतर खर्च पालकमंत्री धनंजय मुंडे करणार असून महिला आघाडी या प्रकरणी मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कायम सोबत राहणार असल्याचे तूपसागर यांनी म्हटले आहे . 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!