बीड

पो.नि. भारत राऊतांचा चोरट्यांना आणखी एक दणका, चोरट्यांना ताब्यात घेवून चौदा लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त, चोरी गेलेल्या 24 दुचाकी, 1 बोलेरो पिकअप आणि सात मोबाईल मिळाले


बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी वाहने चोरणार्‍यांना आणखी एक मोठा दणका दिला आहे. त्यांच्या नेतृत्वात केलेल्या कारवाईमध्ये पथकाने चोरटट्यांना ताब्यात घेवून तब्बल चौदा लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी चोरट्यांकडून पोलिसांना 24 दुचाकी, एक बोलेरो पिकअप आणि सात मोबाईल मिळाले आहेत. भारत राऊत यांच्या या कारवाईचे पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी, प्रभारी पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार आणि स्वाती भोर यांच्यासह जिल्हा पोलिस दलातील अधीकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यात दुचाकी व मोबाईल चोरीचे गुन्ह्यात वाढ झाल्याने सदरची बाब पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी गंभीरतेने घेवून दि. 1 जुलै रोजी एलसीबीचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांना एक विशेष पथक नियुक्त करुन जिल्हयात चोरीस गेलेले मोबाईल, मोटार सायकल व आरोपीची माहिती काढून चोरी गेलेले मोबाईल व मोटार सायकल हस्तगत करणे बाबत आदेशीत केले होते, त्यानुसार राऊत यांनी एलसीबीतील एक पोलीस अधिकारी व 05 अंमलदारांचे पथक तयार केले. सदर पथकाने दि. 2 जुलै ते दिनांक 19 जुलै 2021 रोजी पर्यंत ( 08 ) इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून एक बोलेरो एक बोलेरो कंपनीचे पिकअप, एक स्कुटी किं .5.50,000 / – रु . व 07 ) मोबाईल किं , 1,00,000 / – रु.चे असा एकूण 6,50,000 / – रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवारी विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटार सायकल चोरीचे आरोपींचा शोध घेत गढी येथे असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, शेख एकबाल उर्फ अणू व त्याचा मित्र अजय राठोड दोन्ही रा.गेवराई हे दोघे दोन चोरीच्या मोटार सायकलसह गेवराई येथून गढीकडे येत आहेत . अशी खात्रीलायक माहिती मिळालेवरुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गढी येथील उड़ान पुलाच्याखाली सापळा लावून थांबले असता वरील बातमीतील दोन्ही इसम गेवराईकडून गढीकडे येत असल्याचे दिसल्याने त्यांना थांबवून त्यांना त्यांचे नाव , गांव विचारले असता 1 ) शेख एकबाल उर्फ अस्पृ शेख अहेमद वय 32 वर्षे 2 ) अजय बबन राठोड वय 22 वर्षे दोन्ही रा.गेवराई यांना त्यांचे ताब्यातील स्प्लेंडर व कऋ डिलक्स मोटार सायकल व कागदपत्राबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देवून समाधानकारक माहिती दिली नाही म्हणून त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता शेख एकबाल उर्फ अणू याने सांगीतले की , मी अजय राठोड व आमचा एक साथीदार यांनी चकलांबा येथून एक महिण्यापुर्वी एक स्प्लेंडर मोटार सायकल व चार महिण्यापूर्वी शेवगाव जि.अ.नगर येथून कऋ डिलक्स मोटार सायकल चोरुन आणलेली आहे . त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सांगीतले की , आम्ही आमच्या एका साथीदाराचे मदतीने जालना , आरंगाबाद , अहमदनगर , सांगली , कोल्हापूर , नाशिक , कल्याण येथून एकुण ( 23 ) मोटार सायकली चोरी करुन आणलेल्या आहेत . चोरलेल्या मोटार सायकलपैकी ( 03 ) मोटार सायकल गेवराई येथे अजय राठोड याचे घरी ठेवल्या असून बाकी मोटार सायकल अजय राठोड याचे मदतीने त्याचे गावातील लोकांना फायनान्सच्या गाड्या असून काही रक्कम घेवून व कागदपत्र दिल्यानंतर उर्वरीत रक्कम द्या , असे सांगून विकल्याचे सांगीतले . ज्यांना गाडया विकल्या त्यांना संपर्क करुन त्यांचेकडून ( 18 ) मोटार सायकल जमा केल्या . अशाप्रकारे वरील दोन्ही आरोपीकडून एकूण ( 23 ) चोरीच्या मोटार सायकल हस्तगत केल्या . ताब्यात घेतलेल्या मोटार सायकलमध्ये हिरो होंडाशाईन ( 10 ) , स्प्लेंडर ( 06 ) , कऋ डिलक्स ( 03 ) , युनीकॉर्न ( 02 ) , पॅशन प्रो . ( 01 ) , ङच् फ्रिडम ( 01 ) अशा कंपनीच्या गाड्या असून मो.सा.चे इंजिन व चेसीज क्रमांकावरुन मालकी हक्क व चोरीबाबत खात्री केली असता , एक मोटार सायकल पो.स्टे.चकलांबा येथील गुरनं 147/2021 कलम 37 9 भादवि मधील असल्याचे निष्पन्न झाले व बाकी मोटार सायकलपैकी जालना येथून ( 0 9 ) , औरंगाबाद येथून ( 07 ) , अहमदनगर येथून ( 02 ) , सांगली येथून ( 01 ) , कोल्हापूर येथून ( 01 ) , नाशिक येथून ( 01 ) , कल्याण यधून ( 01 ) अशा एकूण ( 23 ) मोटार सायकल चोरुन आणलेल्या आहेत , चोरीच्या मोटार सायकल बाबत संबंधीत जिल्हयात विचारपुस केली असता मोटार सायकल चोरी संबंधाने विविध पो.स्टे.ला गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहेत . वरील दोन्ही आरोपींना पो.स्टे.चकलांबा गुरनं 147/2021 कलम 37 9 भादविचे तपासकामी गुन्हयातील चोरलेल्या मोटार सायकलसह एकूण ( 23 ) चोरीच्या मोटार सायकल सोबत हजर केले आहे. पुढील तपास चकलांबा पोलीस करीत आहेत, ज्यांच्या मोटार चोरी गेल्या आहेत, त्यांनी पो.स्टे.चकलांबा येथे संपर्क साधावा. दिनांक 01/07/2021 ते दिनांक 20/07/2021 रोजी पर्यंत स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ( 10 ) आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून एकूण ( 24 ) मोटार सायकल , ( 01 ) बोलेरो पिकअप , ( 07 ) मोबाईल असा एकूण 14,60,000 / – रु.चा माल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखली संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!