महाराष्ट्र

लक्षात ठेवा, माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा आहेत, जोपर्यंत शक्य तोपर्यंत धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार, पाठीमागून वार करणाऱ्या नेत्यांना पंकजाताईंनी पुन्हा “”मी कुणालाही भीत नसल्याची आठवण करून दिली

मुंबई, 13 जुलै : बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले. या नाराजीनंतर त्यांनी आपले राजीनामे सत्र सुरू केलं. याच दरम्यान पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) दिल्लीत जावून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. त्यानंतर आता पंकजाताई मुंडे मुंबईत आल्या आहेत. मुंबईत आपल्यावर पंकजाताई मुंडे आपल्या समर्थकांसोबत संवाद साधला.

मंत्रिपदाची मागणी हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार नाहीत. मला कधी वाटलं नाही, मला मंत्री करा संत्री करा. माझ्या समाजाच्या मंत्र्याला मी कशाला अपमानित करू. प्रितम ताई मंत्री नाही झाल्या. मी 45 वर्षांची आहे. कराड साहेब 65 वर्षाचे आहे. मी त्यांचा अपमानित करणार नाही असं म्हणत भागवत कराड यांना मिळालेल्या मंत्रिपदावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
पंकजा मुंडेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं
मी घरात बसणार आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार हे मान्य नाही
मी तुम्हाला शांत करण्यासाठी वेळ दिला आहे
तुम्ही जे केलं ते मला विचारून केलं का?
तुमच्या रक्तात राग आहे
लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात
मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजुर करत आहे
मी कोणतंही पद मिळवण्यासाठी राजकारणात नाही
मी तुमच्या प्रेमाबद्दल रून व्यक्त करते
तळागाळातील माणूस सर्व ठिकाणी पोहोचला पाहिजे हे मुंडे साहेबाना वाटतं होते
मुंडे साहेबाना वाटतं होत की महाराष्ट्राची व्हावी
मला राजकारणात आणलं कारण मोठ्या आणि भव्य विचाराने आणले
मंत्रिपदाची मागणी हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार नाहीत
मला कधी वाटलं नाही. मला मंत्री करा संत्री करा
मला दिल्लीत कुणीही झापलं नाही

जोपर्यंत शक्य तोपर्यंत धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार
मी कुणालाही भीत नाही
आपलं घर का सोडायचं? राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंचा सवाल
माझा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा आहेत
मी पराभूत झाले मला वाईट वाटत नाही
मला दबाव तंत्र आणायची गरज नाही
तुम्हाला वाटतं मला छापले असेल
माझी पंतप्रधानांबरोबर चांगली चर्चा झाली
तुम्हाला वाईट दिसत आहे. जरा डोळे चोळून बघूया.
केंद्रीय मंत्री नाही तरी संघटन मंत्री आहे

मी कधी म्हटले नाही मला मुख्यमंत्री करा पण लोक पंतप्रधान होतो म्हणतात
आम्ही नविन काळातली योध्या आहे
मला शक्य आहे तोपर्यंत मी धर्म युद्ध रोखण्याचा प्रयत्न करेन
कौरवांच्या सेनेत अनेक लोक आहेत जे शरीराने त्यांच्या बरोबर आणि मनाने पांडवाबरोबर होते
इतक्या चिल्लर लढाईत मी पडत नाही
आज आपण धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहोत
सगळ्यांनी सांगितले की मिळायला पाहिजे होते
केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा
मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला
घर फुटल्याचं दु:ख आम्ही झेललं आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!