बीड

सलीम जहाँगीर यांच्या प्रयत्नामुळे ईद , अक्षय तृतीयाच्या अनुशघाने प्रशासनाने बँकांना वेळ वाढवून दिली

बीड (प्रतिनिधी ) लॉकडाऊन काळात बँकांना केवळ 2 तासांची तीही मर्यादित व्यवहाराची मुभा असल्याने सामान्य नागरिक, निराधार व्यक्ती त्याचबरोबर वैद्यकीय कामासाठी गरजूंची अडचण होत होती. यासंदर्भात सोमवारी सकाळी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची भेट घेतली. ईद , अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर आणि नागरिकांची होणारी अडचण दूर करून बँकांची वेळ वाढवून द्यावी आणि अन्य व्यवहारास मुभा द्यावी अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केली. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बँकांची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाढविली आहे.

बीड जिल्हा प्रशासनाने कोव्हिडच्या अनुशंगाने निर्बंध कडक केलेले आहेत. बँकांनाही सकाळी 10 ते दु.12 पर्यंतची वेळ देण्यात आली होती. त्यातही केवळ अतंर्गत कामकाज व शासकीय व्यवहाराची मुभा देण्यात आली होती. यासंदर्भात भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी प्रशासनाला निवेदन रमजान ईद, अक्षय तृतीया यासह हॉस्पिटल ,निराधारांचे पगार या सर्व विषयांवर चर्चा केली आणि वेळ वाढवण्याची व अन्य अत्यावश्यक सेवेतील व्यवहार करण्यास मुभा देण्याची मागणी केली होती. त्या अनुशंगाने प्रशासनाने दि.10 ते 15 मे पर्यंत बँकेची वेळ सकाळी 10 ते दु.2 वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळुन केली आहे. यावेळेस अतंर्गत कामकाज, शासकीय व्यवहार, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी धारकांचे व्यवहार, कृषी विषयक व्यवहार, वैद्यकीय कारणास्तव केले जाणारे व्यवहार व सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी यांच्या वेतनाबाबतचे व्यवहार, अत्यावश्यक सेवेतील संबंधित असणार्‍या आस्थापना यांना यावेळेत बँकेत जावुन व्यवहार करण्याची मुभा देण्यात आल्याचे सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!