धारूर

वा, आवरगावकर वेरी गुड..! स्मार्ट ग्राममधील सुविधा, कामे आणि स्वच्छता पाहूण झेडपीच्या एसीईओंनी केले सरपंच, ग्रामसेवक अन् ग्रामस्थांचे कौतूक


धारूर, दि. 6 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील आवरगाव हे जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेत प्रथम आले आहे. याअनुषंगानेच या गावाला वरिष्ठ अधिकारी भेटी देत आहेत. मंगळवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी भेट दिली, वा, वेरी गुड’ अशा शब्दात भंडारी यांनी गावातील सुविधा, झालेली कामे आणि स्वच्छता पाहूण सरपंच, ग्रामसेवक अन् ग्रामस्थांचे भर भरून कौतूक केले आहे.
आवरगावची ओळख संपूर्ण जिल्ह्याबरोबरच मराठवाड्याला आहे. संपूर्ण मराठवाड्यात टिकून असलेली आवरगावची ही ओळख यापुढेही कायम राहणार आहे. कारण आता विकास कामांबरोबच स्वच्छेताच्या माध्यमातून या गावाचा सर्वत्र डंका पहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत या गावाने तालुकास्तराबरोबरच जिल्हास्तरावर बाजी मारली आहे. त्यामुळे आता या गावाला एक एक वरिष्ठ अधिकारी भेटी देत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मागच्या महिणाभरापुर्वीच गावाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी चौहू बाजूने गावाची पाहणी केली होती. गावातील सुविधा आणि गावात झालेली कामे पाहूण सीईओंनी सरपंच पद्मीनीबाई जगताप, युवा नेते अमोल जगताप, ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे यांच्याबरोबरच संपूर्ण ग्रामस्थांचे भरभरून कौतूक केले होते. त्यांच्यानंतर काल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनीही आवरगावला भेट दिली, गावात झालेली कामे, गावात राखलेली स्वच्छता पाहूण तेही आक्षरक्ष: भारावून गेले, वा वेरी गुड’ अशा शब्दात त्यांनी आपला अभिप्राय नोंदवून सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांचे त्यांनीही भरभरून कौतूक केले. गावामध्ये उत्तम पध्दतीने वृक्षारोपण केले असून लोकसहभागतून शंभर टक्के झाडे जगविण्यात आली आहेत. क्रिडांगण, वाचनालय, व्यायामशाळा, बाजारपेठ, भुमिगत गटारे व शोषखड्डे,गोबरगॅस व इतर उपक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे राबविण्यात आली आहेत. ग्रामस्थांमध्ये चांगला एकोपा असून सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांची गावाप्रती बांधिलकी पाहूण मला समाधान वाटले. गाव व परिसर अत्यंत रम्य व सुंदर असून गावाला भेट दिल्याचा मनापासून आनंद वाटला. ग्रामपंचायतींच्या पुढील वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा, असे आनंद भंडारी यांनी आपल्या अभिप्रायामध्ये म्हटले आहे. गावाला भेट दिल्यानंतर युवा नेते अमोल जगताप यांनी ग्रामपंचायत कार्यालयात भंडारी यांचा सन्मान केला. यावेळी धारूर पंचायत समितीच्या अधिकार्‍यांबरोबरच ग्रामस्थांची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!