धारूर

गणेश भोजनालयाचे मालक सिताराम शिंदे यांचे निधन


धारुर, दि. 19 (लोकाशा न्यूज) : आवरगाव (ता.धारूर) येथील सिताराम काशिराम शिंदे यांचे गुरूवारी पहाटेच्या सुमारास अंबाजोगाई येथील रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 55 वर्षे होते. धारूरमध्ये गणेश भोजनालयच्या माध्यमातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. त्यांच्या अचाणक जाण्याने आवरगाव, धारूर आणि धारूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, भाऊ, भाऊजया, मुलगा, दोन मुली, जावई, पुतणे असा मोठा परिवार आहे. शिंदे कुटूंबियांच्या दु:खात दै. लोकाशा परिवार सहभागी आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!