देश विदेश

राज्यात उलथापालथ?, पवार, पटेल केंद्रीयमंत्री शहांच्या भेटीला

मुंबई, दि.28 (लोकाशा न्युज) ः महाराष्ट्राच्या ठाकरे-पवार सरकारच्या राजकीय भवितव्यावर परिणाम घडविणारी महत्त्वाची घडामोड शुक्रवारी मध्यरात्री घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये शांतिग्राम गेस्ट हाऊसमध्ये भेट घेतल्याची महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. दिव्य भास्करच्या गुजराती आवृत्तीत ही बातमी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिध्द झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीच्या ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या आहेत.
अर्थात शिवसेनेला बाजूला करून राष्ट्रवादीशी सलगी करण्याचा भाजपचा आधीही प्रयत्न झाला आहे. पण त्यावेळी राष्ट्रवादीने आधी भाजपशी जवळीक करून नंतर त्यांनाच धक्का दिलेला आहे. अजित पवारांबरोबर सरकार स्थापनेचा प्रयत्न सव्वा वर्षापूर्वीच करून पाहिला पण भाजपच्या अंगलट आल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. आता पुन्हा नव्याने प्रयोग होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुकेश अंबानी अँटिलिया स्फोटके प्रकरण-सचिन वाझे-मनसुख हिरेन हत्या प्रकरण तसेच पोलीसांच्या बदल्या-पोस्टिंग रॅकेट या सगळ्या प्रकरणांमध्ये ठाकरे-पवार सरकार रूतत चालले आहे. त्यातही शिवसेनेचे नेते सगळ्या बाजूंनी अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयात शिवसेनेच्या मंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याची चर्चा आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या समवेत शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ही भेट गुप्त स्वरूपात राहावी. याची बातमी कोठेही बाहेर फुटू नये, यासाठी अहमदाबादमध्ये शांतिग्राम गेस्ट हाऊसमध्ये भेट घेण्याचे ठरले आणि त्यानुसार ही बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र टिव्ही9 या वृत्तवाहिनीने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांची भाजपा संबंधि एका बड्या उद्योगपतीसोबत अहमदाबाद येथे भेट झाल्याचे वृत्त दिले आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!