धारूर

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणार्‍या चार शिक्षकांवर धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल


बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 15 जानेवारी रोजी 4 ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे . त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती . त्यांची नियुक्ती करूनही गैरहजर राहणार्‍या चार शिक्षकावर आदेशाचा आवमान केला म्हणून धारूर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
धारूर तालुक्यात पाच ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे . यामध्ये एक ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे तर चार ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी प्रत्यक्षरीत्या मतदान प्रक्रया पार पडत आहे . या निवडणुकीसाठी तहसीलदार यांनी मतदान कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती . मतदान केंद्रावर प्रक्रियेसाळी नियुक्त केलेले करण्यात आलेले कर्मचारी यांनी प्रत्येक प्रशिक्षणास उपस्थित राहणे अपेक्षित होते . तथापी चार कर्मचारी हे विविध प्रशिक्षणास अनुपस्थित राहून मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना करतानाही अनुपस्थित राहिले.त्यांच्या अशा बेजबाबदार वर्तनामुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण झाल्याचे दिसून आले असल्याने उपलब्ध यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ताण पडलेला होता . संबंधित कर्मचारी यांच्याकडून निवडणूक विषयक कामास गैरहजर राहून जाणीवपूर्वक त्याचा अवमान करणे व निवडणूक कार्यात बाधा निर्माण करण्याचा प्रकार घडला होता त्या नुसार तहसिलदार यांनी आदेश काढून गट शिक्षणाधिकारी गौतम चोपडे आदेश दिले होते . श्री . चोपडे यांनी केंद्रप्रमुख एस .एस. सुरवसे यांना यासंबंधी गुन्हा नोंद करण्यास प्राधिकृत करण्यात आले होते . यानुसार श्री सुरवसे यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यांमध्ये शिक्षक अर्जुन मुंडे, कैलास चाटे, अशोक मुंडे, मधुकर आदमाने या चार जणांविरुद्ध सायंकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे .शिक्षकाविरोधात गुन्हा नोंद झाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!