धारूर

दुचाकीच्या अपघातात माजी सैनिक ठार

किल्लेधारूर दि.८ : धारूर तालुक्यातील गांजपूर येथील भारतीय सैन्यातून सेवा निवृत्त झालेले हवालदार नारायण विश्वनाथ घुले यांचे गुरुवारी रात्री आठ वाजता अपघाती (Accident) निधन झाले.

भारतीय सैनेत २६ वर्ष सेवा करून हवालदार पदावरून सेवा निवृत्त झालेले नारायण घुले हे एम एस ई बी धारूर (Dharur) येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. ते केज येथे वास्तव्यास होते. केज येथून गांजपुर येथील आपल्या शेती कडे जात असताना तांबवा पाटीवर धारूर कडून येणाऱ्या मोटार सायकलचा अपघात (Accident) झाला. या अपघातात जबर मार लागल्याने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने गांजपूरसह धारूर (Dharur) तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!