धारूर

पोलीस उपअधिक्षक अशोक नखाते यांना पितृशोक,सेवानिवृत्त शिक्षक भगवानराव नखाते यांचे निधन,गुरूवारी सकाळी अंत्यसंस्कार


किल्ले धारूर (वार्ताहर )
तालूक्यातील हसनाबाद येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक भगवानराव नामदेवराव नखाते वय 84 वर्ष यांचे वृध्दापकाळाने दि 23 डिंसेबर रोजी बुधवारी निधन झाले त्यांचे पार्थिहावर गुरूवारी सकाळी हसनाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत ते नाशीक येथे पोलीस उपअधिक्षक म्हणूण कार्यरत असणारे अशोक नखाते यांचे वडील होते.

भगवानराव नामदेवराव नखाते सेवानिवृत्त शिक्षक यांचे दीर्घ आजाराने बुधवार दि.23 डिंसेबर रोजी शासकीय रुग्णालय आंबेजोगाई येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचे वय 84 होते ते मागील दोन महिन्यापासून मेंदू कर्करोग आजाराने ग्रस्त होते ते 1961ला जिल्हा परिषद शिक्षक म्हणून रुजू झाले व 1997 ला सेवानिवृत्त झाले शालेय नोकरी करत करत त्यांना कीर्तन भजन संप्रदायीक छंद होते तसेच सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक या क्षेत्रांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता व अध्यात्मिक क्षेत्रात ते सढळ हाताने मोठा दान-धर्म करत असत त्यांचा लहान मुलगा पोलीस उपअधीक्षक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहेत व मोठा मुलगा पारंपारिक शेती व्यवसायात आहे लहान मुलगा अशोक नखाते पोलीस उपअधीक्षक नाशिक व गणेश शिवाजी सोळंके विद्युत निरीक्षक बीड वर्ग 1 या या दोघांना अधिकारी करण्यास त्यांचे मोलाचे योगदान होते तसेच किल्ले धारूर पंचक्रोशी मध्ये अनेक विद्यार्थ्यांचे करियर घडवण्यामध्ये त्यांनी आर्थिक सहाय्य केले आहे शेत यांचे योगदान समाजासाठी कधीच विसरण्या दोघे नाही व पुढेही त्यांचा वसा त्यांचे कौटुंबिक चालवत आहेत त्यांचे पार्थीहावर 24 डिंसेबर रोजी सकाळी हसनाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांचे निधना मुळे सर्वञ हळहळ व्यक्त केले जात आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!