धारूर

धारूरमध्ये नववीच्या मुलीची गळफास घेवून आत्महत्या


धारूर : किरकोळ कारणामुळे झालेल्या भांडणाचा राग धरुन शालेय मुलीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.3) रात्री शहरातील पाटील गल्लीत घडल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु नोंदवण्यात आला.
शहरातील पाटील गल्लीत राहणार्‍या पंडित कुटूंबियात घरात आँनलाईन शिक्षणासाठी वापरण्यात येणार्‍या मोबाईल वरुन झालेल्या किरकोळ वादातून घटना झाल्याची चर्चा आहे. दिव्या दिलिप पंडित (14) या नववीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या मुलीने घरातच गळफास घेतल्याचे सायंकाळी 7 च्या सुमारास निदर्शनास आले. कुटूंबियांनी तात्काळ तिस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. धारुर पोलिसात याबाबत खबर देण्यात आली. खबरीत मयत मुलगी ही रागिट स्वभावाची होती, घरगुती किरकोळ कारणाने तिने घरातील दुसर्‍या मजल्यावरील रुममध्ये गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. धारुर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद बाष्टे करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!