धारूर दि. 27 -लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. रस्त्याच्या बाजूने काही लोकांनी अतिक्रमन केले असून सदरील अतिक्रमन हटवण्यात यावे आणि स्मशानभूमीकडे जाण्यासाठी 20 फुटाचा रस्ता द्यावा या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर मृतदेह ठेवण्यात आला होता.
तहसीलच्या डाव्या बाजूला लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून आहे, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. रस्त्याच्या कडेला काही लोकांनी अतिक्रमन करून त्या ठिकाणी आपले दुकाने थाटलेली आहेत. रामलिंग तांबवे (वय 90) या वयोवृद्धाचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तांबवे यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवला. 20 फुटाचा रस्ता उपलब्ध करून देवून रस्त्यावरील अतिक्रमन हटवण्यात यावे अशी मागणी लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली.