बीड

आजही जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांचे होणार व्दिशतक

225 रूग्ण बरे होवून घरी परतणारबीड : कोरोना झाला तरी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही, वेळेवर उपचार केले तर कोरोनावर सहजपणे मात करता येते, हे जिल्ह्यातील अनेकांनी दाखवून दिले आहे. एका बाजूने जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरी दुसर्‍या बाजूने कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्याही तेवढीच मोठी आहे. मागच्या तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणार्‍या रूग्णांची संख्या दोनशेच्या पुढे जात असल्याचे पहायला मिळत आहे. त्यानुसार आज दि. 19 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातून तब्बल 225 रूग्ण कोरोनामुक्त होवून ते घरी परतणार आहेत. यामध्ये सर्वाधित बीडमधील 161 रूग्णांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ आष्टी नऊ, शिरूर 3, गेवराई 3, माजलगाव 7, धारूर 3, केज 12, अंबाजोगाई 14 आणि परळीतील 13 रूग्ण बरे होवून घरी परतणार आहेत. जिल्ह्यात 2972 रूग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1231 रूग्णांवर सुरू आहेत. 1665 रूग्ण बरे होवून घरी परतलेले आहेत तर 76 जणांचा मृत्यू झालेला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!