मराठवाडा

भूकंपाने मराठवाडा हादरला, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांची पडझड

परभणी दि.२१ – मराठवाड्यातील (Marathwada) नांदेड (Nanded), हिंगोलीसह (Hingoli) परभणीत (Parbhani) आज सकाळी भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घराबाहेर पडतांना पाहायला मिळाले. काही ठिकाणी 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची तर काही ठिकाणी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे.

                    सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात सकाळी 6. 9 मिनीटांनी भूकंपाचा धक्का जाणवला, परभणीत देखील सकाळी 6 वाजून 9  मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला, तर, याचवेळी हिंगोलीत देखील भूकंपचे धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात 1993 नंतरचे सर्वात मोठे धक्के असल्याचे माहिती मिळत आहे. याबाबत माहिती देतांना एमजीएमच्या खगोलशास्त्र अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले की, “आज सकाळी 06:08:30 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे. लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी 06:19:05 वाजता 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तिन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील 1993 च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठे धक्के असल्याचे औंधकर म्हणाले.

                   हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून, याची तीव्रता हिंगोली, परभणी, नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांमध्ये जाणवली. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. तर, काँक्रीटच्या घरांना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेले आहेत. तर, काही मातीची घर कोसळली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांचे नुकसान सुद्धा झाला आहे.

          दरम्यान, आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिक तात्काळ घरातून बाहेर पडत मोकळ्या जागेत आणि रस्त्यावर येऊन उभे राहिले. अजूनही लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले त्या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी देखील पोहचले असून, सर्व घटनेचा आढावा घेतला जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!