मराठवाडा

जिल्ह्यातील सहाही नगर पालिकावर नेमणार प्रशासक; प्रधान सचिवाने काढले आदेश

बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : संपूर्ण जगभर पसरलेल्या साथरोग कॉविड -१९ च्या राज्यात झालेल्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने मुदत समाप्तीनंतर संबंधित नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. याच अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी यांची आपल्या विभागातील संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या प्रशासक पदी नियुक्त करण्यात येत आहे. संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतींची मुदत संपताच तेथे संबंधित उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी यांच्या नावाने आपल्या स्तरावरुन आदेश काढून सदर अधिकान्यांना प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारण्याबाबत सूचित करावे, तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत देखील सूचित करावे असे आदेश राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी औरंगाबाद विभागाचे आयुक्त व या विभागातील आठही जिल्ह्याधिकारी यांना सोमवारी दि. 27 डिसेंम्बर रोजी दिले आहेत. औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यातील नगर पालिका, नगरपंचायतमध्ये प्रशासक नेमन्याचे आदेश आल्याने आता बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, धारूर, परळी या सहा नगरपालिकावर लवकरच प्रशासक नेमले जाणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!