मराठवाडा

एसीबीचा मोठा दणका, लाख रुपयांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकरांना पकडले


भूम, भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यावर मंगळवारी उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती . एक लाख 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे मात्र हा देवाण – घेवाणीचा सौदा एक लाख रुपयांवर झाला ती रक्कम मंगळवारी देण्यात आले यावेळी ही कारवाई करण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे.मंगळवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली असल्याची माहिती आहे . भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांच्यासह एका कोतवालास 1 लाख 10 हजारची लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे . वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा लाच मागितली होती . मनिषा अरुण राशिनकर व विलास नरसींग जानकर यांना अटक करण्यात आली आहे .1 लाख 10 हजार ची मागणी करून तडजोडी अंती 90 हजार व 20 हजार आरोपी जानकर यांच्या हस्ते स्विकारले . तक्रारदार यांचा एक टीप्पर व त्याच्या पाहुण्यांचा जे.सी.बी.व तीन ट्राक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी लाच घेतली असून पो.स्टे.भुम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे . सापळा अधिकारी प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक , ला.प्र.वि . उस्मानाबाद यांनी डॉ . राहुल खाडे , पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि.औरंगाबाद ब्रम्हदेव गावडे , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि.औरंगाबाद कारवाई केली . या पथकात पोलिस निरीक्षक गौरिशंकर पाबळे , अंमलदार दिनकर उगलमुगले , विष्णू बेळे , विशाल डोके यांचा समावेश होता .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!