Uncategorized

गायींची तस्करी करणारा टेम्पो पकडला, 11 गाई, आठ वासरांची कसायच्या तावडीतून केली सुटका, सहा लाख रूपयांचा मुद्देमाल केला जप्त


बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : 17 एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातममी दारामार्फत माहिती मिळाली की आयशर टेम्पो क्रमांक (एम. एच. 12 एचडी 0 421) मध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या आपल्या स्वतःची फायदा करिता नेकनूर येथून अकरा गाई, आठ वासरे टेम्पोमध्ये भरून कत्तल करण्यासाठी बीड येथे घेऊन जात आहे, अशी माहिती मिळाल्यावर सदरची माहिती पोलीस ठाणे नेकनूर येथील पोलीस नाईक प्रशांत क्षीरसागर यांना कळवून सदर वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पोस्टे नेकनूर येथील पोलीस अंमलदार यांनी मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहितीचे आधारे सदरचा टेम्पो बीड नेकनुर ते बीड जाणारे रोडवर नेकनूर येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे दुपारी दोन वाजता टेम्पो थांबवून टेम्पो चालकास नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव शेख मज्जिद शेख राजा (रा मोमिनपुरा बीड) असे सांगितले, सदर टेम्पोची पाहणी केली असता सदर टेम्पोमध्ये अकरा गाई व 8 वासरे मिळून आले, सदर टेम्पो चालकास गाईचे व वासरांचे दाखल याबाबत विचारपूस केली असता जवळ नसल्याचे सांगून सदरची जनावरे ही (मोमीनपुरा बीड) येथील व्यापारी सोहील जलील कुरेशी यांच्या असून त्यांच्या सांगण्यावरून नेकनूर येथून टेम्पोमध्ये भरून बीड येथे घेऊन जात आहे, असे सांगितल्याने त्याचे ताब्यात मिळून आले जनावरांची किंमत दोन लाख रुपये व टेम्पो किंमत चार लाख असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास जनावराचा टेम्पोस ताब्यात घेऊन पोलीस ठाणे नेकनुर येथे आणून त्याची विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रशांत क्षीरसागर मारुती कांबळे शिवाजी उगलमुगले सय्यद अब्दुल्ला यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!