Uncategorized

देवीबाभुळगाव सोसायटी आ.क्षीरसागरांच्या ताब्यात, महापरिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी

बीड: तालुक्यातील देवी-बाभुळगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीचा निकाल रविवार (दि.१७) रोजी लागला असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महापरिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत.
बीड मतदारसंघातील देवी-बाभुळगाव येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीचे मतदान रविवार (दि.१७) रोजी नुकतेच पार पडले.या निवडणुकीचा निकालही याच दिवशी जाहीर झाला.आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.बाबु जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली येथील महापरिवर्तन पॅनेलचे सर्वच्या-सर्व उमेदवार निवडून आले आहेत.या निवडणूकीणध्ये महापरिवर्तन पॅनेलचे बिभीषण जोगदंड, नेहरू जोगदंड, रमेश जोगदंड, रामदास जोगदंड,व्यंकट जोगदंड, सुभाष जोगदंड, संभाजी जोगदंड, श्रीमंत जोगदंड,रामा शेळके,सुमंत गुरव, शिवाजी गुरव,अंतिकाबाई जोगदंड,शारदा जोगदंड हे १३ पैकी सर्वच उमेदवार, विरोधी पॅनलचा पराभव करत मोठ्या फरकाने निवडून आले आहेत.या विजयाबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!