महाराष्ट्र राजकारण

दोन विद्यमान मंत्र्यांच्या पत्नींचा लवकरच माझ्या शिवशक्ती पक्षात प्रवेश -करुणा धनंजय मुंडे

अहमदनगर: – राज्यामध्ये अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहे, अनेक विषय प्रलंबित आहे,जनता होरपळून निघत आहे, काही कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येते असे विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये व राज्यातील इतर विषयांबाबत पुढील आठवड्यामध्ये राज्याचे राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे माहिती शिवशक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी आज अहमदनगर मधे पत्रकारांशी बोलताना दिली तर दुसरीकडे राज्य सरकारने मंत्र्यांच्या दालनावर सुरू असलेला 3600 कोटी व आमदार निवास बांधण्यासाठी 900 कोटींचा खर्च त्वरित थांबवा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.
आज नगर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना करूणा मुंडे म्हणाले की राज्यामध्ये सध्या करोना लाट आहे पण, आज अनेकांवर उपासमारीची वेळ आले आहे. जे राज्य सरकार मध्ये काम करत आहेत अशा आशा सेविका असो एसटी महामंडळातील कर्मचारी असो यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे आझाद मैदानावर आंदोलन करत आहे, ही बाब सुद्धा अतिशय गंभीर आहे पण दुसरीकडे सरकार कोट्यावधी रुपये मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च करत आहे, ते त्वरित थांबवा पाहिजेल त्यासाठी आम्ही मागणी करत आहोत ते दुसरीकडे विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये सोडून करण्यासाठी आम्ह राज्यपाल कोशियारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.
राज्यभर यामध्ये पक्षाच्या वतीने आम्ही दौरा सुरू केलेला आहे. अनेक प्रश्न आज जनतेसमोर आहेत हे प्रश्न सोडवणे मध्ये सरकार योग्य ती भूमिका घेत नाही, ही सुद्धा बाब निदर्शनास आलेले आहे. मी नुकताच औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असता त्या ठिकाणी माझे पती मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी येऊन माझी सभा रोखण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचे कृत्य सध्या सुरू आहे मात्र न डगमगता माझे कार्य पुढे सुरू करणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. माझ्या पक्षामध्ये अनेक संघटना तसेच इतर पक्षाचे लोक सुद्धा येणार आहेत. त्यासाठी माझी त्यांच्याबरोबर बोलणी सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. करोना काळ संपल्यानंतर आमच्या नव्या पक्षाची घोषणा आम्ही करून नगरमध्ये एक मोठा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा नगर मधली जी स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक असेल ती निवडणूक सुद्धा आमचा पक्ष लढवणार असल्याचे ही करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
आज रस्ते-पाणी यावरून राजकारण केले जाते ही बाब अतिशय निंदनीय आहेत. नगर जिल्ह्यामध्ये पाण्यावरून पंचवीस वर्षे संघर्ष केला जातो अशा साकलाई सिंचन योजनेचा प्रश्न अद्याप पर्यंत मार्गी लागलेला नाही हि सुद्धा खेदाची बाब आहे या संदर्भात मी सकलाई ची सर्व माहिती घेऊन हा प्रश्‍न शासन दरबारी सुद्धा मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले व विशेष म्हणजे कोणतेही पद नसताना हीच योजना मी पूर्ण करणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले. सध्या शाळा बंद आहे अनेक विद्यार्थी शाळेमध्ये न गेल्यामुळे ते वेगवेगळ्या पबजी व अन्य मोबाईल गेम व्यसनाला लागलेले आहेत हे अतिशय गंभीर आहे त्यामुळे आगामी काळामध्ये शाळा या सुरू झाला पाहिजे या मागणीसाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दोन मंत्र्याच्या पत्नी समवेत येणार
माझ्यावर जी परिस्थिती आली ती अनेक मंत्र्यांच्या घरांच्या बाबतीमध्ये सुद्धा आलेली आहे ही वस्तुस्थिती आहे. आमच्या पक्षांमध्ये सध्या विद्यमान मंत्र्यांच्या दोन बायका या माझ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये एक राष्ट्रवादी व एक शिवसेनेच्या मंत्र्यांची पत्नी असल्याचेही करुणा मुंडे यांनी सांगून त्यांची नावे जाहीर करण्यास त्यांनी नकार दर्शवला, पण या दोन्ही महिलांचे आंचयस पक्षातील प्रवेश नगरमध्येच होणार आहेत, हेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

ति’च्याकडे 3 कोटीच्या साड्या
मी राजकारणात येऊ नये म्हणून पती धनंजय मुंडे माझ्यावर दबाव टाकत आहेत, पण एकदा राजकारणात आल्यावर यु टर्न नसतो. नाहीतर विशासहर्ता संपते, असे सांगून करुणा मुंडे म्हणाल्या, मी एकदम साधी राहणारी आहे. मंत्र्यांच्या बायका गाडीतून फिरतात व 25 हजाराच्या साड्या परिधान करतात, पण माझ्याकडे कपाटात 5 लाखाच्याही साड्या नाहीत, पण धनंजय मुंडेंच्या दुसऱ्या पत्नीच्या कपाटात 3 कोटीच्या साड्या आहेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!