महाराष्ट्र राजकारण

अखेर 21 वर्षेच्या तरूणांने मातब्बरांना दाखविली पराभवाची धुळ; आर.आर.पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटीलांचा विजय

कवठेमहांकाळ नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात

कवठेमहांकाळ नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विजय झाला असून रोहित पाटील यांनाही विजय मिळाला आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलला १०, तर शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला. तर एका जागी अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. 
मतदानापूर्वी रोहित पाटील यांनी केलेल्या भाषणातील वक्तव्याची सर्वच ठिकाणी चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेची सांगता रोहित पाटील यांच्याच भाषणानं झालं होती. यावेळी त्यांनी आपले वडील आर. आर. पाटील यांची आठवण काढली होती. “आमच्या मनातील पॅनल निवडलंय असं सर्वसामान्यांचं मत आहे. सर्वसामान्य माणसानं राष्ट्रवादीला खांद्यावर घेतलंय. त्यांनी पक्षाची जबाबदारी घेतलीये. या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारीला जाहीर होईस. निकाल लागल्यानंतर माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही,” असं ते म्हणाले होते.

रोहित पाटलांनी दिली प्रतिक्रिया
“निवडणुकीच विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं होतं. माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही,” अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी विजयानंतर दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!