बीड क्राईम

उपजिल्हाधिकारी आघाव पाटील निलंबित !

बीड- देवस्थान असो की कब्रस्थान अथवा मस्जिद कोणतीही जमीन कोट्यवधी रुपये घेवुन भु माफियांच्या घशात घालण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांना शासनाने निलंबित केले आहे.शुक्रवारी हे आदेश आल्याने पाटलांवर संक्रात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बीड,गेवराई,आष्टी,पाटोदा,केज,अंबाजोगाई, शिरूर अशा कोणत्याही तालुक्यातील इनामी जमीन अथवा देवस्थान किंवा मस्जिद ची जमीन गेल्या तीन चारवर्षात खालसा करण्याचे शेकडो प्रकार बीड जिल्ह्यात झाले.या सगळ्या प्रकारात सर्वपक्षीय पुढारी तर आघाडीवर होतेच पण प्रशासनातील उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील आणि नरहरी शेळके सारखे मस्तवाल देखील होते.
काहीही झालं तरी इनामी किंवा वक्फ बोर्डाची जमीन खरेदी विक्री होत नाही हे माहीत असताना आघाव पाटील सारख्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये घेत नियम,कायदे धाब्यावर बसवले अन हजारो एकर जमीन भु माफियांच्या घशात घातली.
दरम्यान आघाव पाटील असोतकी शेळके यांनी केलेले कुटाने,भानगडी बाहेर आल्या आणि या दोघांसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले.त्यानंतरही आघाव पाटील सारखा अधिकारी मस्तवाल पणे वागत होता.पुन्हा बीडला नियुक्ती मिळावी यासाठी प्रयत्नशील होता. दरम्यान त्यांच्यावर दाखल झालेले वेगवेगळे गुन्हे लक्षात घेऊन शासनाने 14 जानेवारी रोजी त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!