बीड गेवराई

चकलांबा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार यांची दारूच्या नशेत जेष्ठ नागरिकांला घरात घुसून मारहाण

तगंड तोडण्याची दिली धमकी गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोळगाव, दि.03 :- गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी येथील जेष्ठ नागरिक गणपत देशपांडे यांच्या घरी रात्रीच्या दि.02 ऑक्टोबर रोजी वेळी घरी जाऊन बोलावुन घेऊन डाव्या कानशिळामध्ये मारून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत माझ्या मुलाची माफी माग नसता तुझ तगंड काढतो अशी धमकी दिली आहे. हा प्रकार जेष्ठ नागरिक सन्मान दिनानिमित्त घडला असून अश्या पोलिस जनसेवक विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
मिळालेली माहिती अशी की गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील जेष्ठ नागरिक गणपत देशपांडे (वय -70) यांचे राममंदिर जवळ घर आहे. त्यांना मुलगा नसुन दोन मुली आहेत त्यांच्या एका मुलीचे अक्शीडंन्ट मध्ये वारले असुन त्याच्या मुलगी व नातु हे १०० % अपंग आहेत. ते राममंदिराचे पुजारी आहे. तसेच चकलांबा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पवार हे सुध्दा नोकरीच्या ठिकाणी राहतात. दि.02 ऑक्टोबर 2021 रोजी पवार यांच्या लहान मुलांने मंदिराजवळ लघवी केली म्हणून गणपत देशपांडे विचारणा लघवी करू नको असे बोलले.मुलांत यांच्यात काही बाचाबाची झाली. यांची माहिती एपीआय असणारे पवार यांना माहिती झाली. त्या वेळी त्यांनी रात्रीच्या वेळेस गणपत देशपांडे यांच्या घरात घुसून त्याना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. यावेळी ते दारूच्या नशेत होते. त्यांना बाहेर काढून मारहाण करत डाव्या कानशिळामध्ये जोरात मारली. माझ्या मुलाची माफी माग नसता तुझ तगंड काढतो अशी धमकी दिली आहे. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर चकलांबा पोलिस ठाण्यात गावातील नागरिक, युवक पत्रकार यांनी चक्क पोलिस ठाण्यात जाऊन जाब विचारला. यावेळी ठाण्याचे प्रमुख भास्कर नवले तसेच डी.वाय.एस.पी यांच्या समोर हा प्रकार गावकऱ्यांनी सांगितला असून आता अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. तसेच याविषयी पोलिस उपनिरीक्षक पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास टाळले.

पवार यांची कामगिरी वादग्रस्त..
चकलांबा पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून दिगांबर पवार हे येथे मागील एक वर्षापासून कार्यरत असून त्यांची कामगिरी वादग्रस्त राहिली. त्यांचा संपूर्ण वावर अवैध धंदे चालक, वाळू उपसा करणार्या, दारू विक्री करणाऱ्या गुन्हेगार यांच्याशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून जेष्ठ नागरिकांना झालेली मारहाण तीव्र निषेधार्थ आहे. जोपर्यंत मद्यधुंद पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार असे चकलांबा येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा खेडकर यांनी सांगितले आहे. एकीकडे चकलांबा पोलिस अधिकारी वाळू उपसा, गुटखा बेकायदेशीर दारू विक्री मटका, जुगार, अवैध धंदे यांच्याकडून पैसे जमा करत हप्ता घेत आहेत. या पोलीसांना अवैध धंदे रोखण्यासाठी अपयश आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!