अंबाजोगाई

आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाच्या सवलती द्या – खा. प्रीतमताई मुंडे

अंबाजोगाई : धनगर समाजाला ज्याप्रमाणे राजकीय आरक्षणा व्यतिरिक्त एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती मिळतात, त्याच प्रमाणे आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाला आरक्षणाच्या सर्व सवलती मिळाव्यात अशी आपली भूमिका असल्याचे बीड जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनी नमूद केले. अंबाजोगाई येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना त्या बोलता होत्या.

खा. प्रीतमताई मुंडे रविवारी (२७ जून) अंबाजोगाई भेटीत पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड नैराश्याचे वातावरण आहे. याबाबत चर्चा करताना खा. प्रीतमताई मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पूर्ण समर्थन असून आरक्षण निश्चितच मिळायला हवे अशी भूमिका मांडली. समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे. त्याकडे जातीचे लेबल लावून पाहू नका. ‘ओबोसी’चा लढा राजकीय आरक्षण पूर्ववत मिळावे यासाठी आहे तर मराठा समाजाचा लढा शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाच्या मागणीसाठी आहे. दोन्ही मागण्या भिन्न आहेत आणि या दोन्हीलाही आमचा सर्व ताकदीनिशी पाठींबा आहे.ओ बीसी आरक्षण ला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले चपाहिजे ही आमची भूमिका आहे .जेव्हा मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळी लोकसभेत सर्वप्रथम हा मुद्दा मांडणारी मी महाराष्ट्रातील पहिली खासदार होते. आतापर्यंत तीन वेळेस मी मराठा आरक्षणासाठी लोकसभेत बोलले आहे. यापुढेही मराठा समाजाच्या लढ्यात आमचे पूर्ण योगदान राहील. धनगर समाजाला राजकीय आरक्षणा व्यतिरिक्त एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती मिळतात. त्याचप्रमाणे आरक्षण जेंव्हा मिळायचे ते मिळेल, परंतु आरक्षणाच्या सवलती ताबडतोड देण्यात याव्यात अशी आमची भूमिका असल्याचे खा. मुंडे यांनी स्पष्ट केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!