क्राईम

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काऊण्टर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

मुंबई – स्फोटकाने भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. एनआयएने शर्मांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्माही एनआयएच्या रडारवर होते. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करत एनआयएने त्यांना ताब्यात घेतले. एनआयए कार्यालयात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्य राखीव दलाचं पथक शर्मांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलं आहे.

मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात याआधीही दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली आहे. आता त्यांच्याविरोधात नव्याने पुरावे मिळाल्याची शक्यता असून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!