धारूर, दि. 23 :
किल्लेधारुर तालुक्यातील मौजे आवरगाव येथील माजी सरपंच व माजी खासदार कै. रामरावजी आवरगावकर यांचे बंधू दादासाहेब ज्ञानोबा जगताप (वय 85 वर्ष) यांचे शुक्रवारी दुपारी दुःखद निधन झाले.
पंधरा दिवस आजाराशी झुंज देत 23 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांच्या या जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुली एक सुन, भाऊ, भाऊजई, पुतने, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जगताप कुटुंबियांच्या दुखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.