पाटोदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीरपणे गोरगरिबांच्या पाठीशी, जनकल्याणाच्या योजना घराघरापर्यंत पोहचवा – खा. प्रीतमताई, लाभार्थ्यांना घरकुलाच्या पहिल्या हप्प्त्यापोटी वाटप केले नऊ कोटी


पाटोदा, दि. 25 (लोकाशा न्यूज) : पाटोदा पंचायत समिती अतंर्गत प्रधानंमत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच पशुसंवर्धन विभागा अंतर्गत नाविन्यपुर्ण योजना, विशेष घटक योजना या लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता वाटप व अनुदान चेक वाटप सोहळा गुरूवारी बीड जिल्हयाच्या लोकप्रिय खा. डाँ प्रितमताई मुंडे यांच्या शुभहस्ते तहसील कार्यालयाच्या सभाग्रह पाटोदा या ठिकाणी सपंन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन राजु काका धोंडे,भाजपचे जिल्हा ऊपाध्यक्ष तथा प्रभारी पाटोदा तालुका अध्यक्ष अँड सुधीर घुमरे ,पंचायत समीती सभापती सुवर्णाताई काकासाहेब लांबरूड ,पंचायत समीतीचे प्रभारी गटविकास आधिकारी सरवदे,ऊपसापती देवीदास शेडंगे,भाजपचे जेष्ठ नेते मधुकर गर्जे माजी सभापती पुष्पाताई सोनवणे,पंचायत समीती सदस्य महेंद्र नागरगोजे,पंचायत समीती माजी उपसभापती सत्यसेन मिसाळ काकासाहेब लांबरूड यांची उपस्थीती होती, यावेळी बोलताना खा.प्रितमताई मुंडे यांनी आगामी काळात कार्यकर्त्यांनी घरोघरी जनसंपर्क करून केंद्र सरकारच्या मोदीजी यांच्या घरकुल आभियानाची अनुदान वाटपाची जनजाग्रुती करावी कारण हे अनुदान कोणी दिले हा लाभ कोणामुळे मिळाला याची माहीती होणे आवश्यक आहे हे जर कार्यकर्त्यांनी सागितले नाही तर सामान्य जनतेला माहीती होत नाही वैयक्तीक खात्यावर थेट ही रक्कम जमा होते, याचा फायदा लाभार्थी यांना होतो कुणालाही आधिकारी वर्गाला पैसे मोजावे लागत नाहीत, पाटोदा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना एकुण लाभार्थी 527 रमाई आवास योजना लाभार्थी 177 एकुण 704 लाभार्थी यांना प्रत्येकी एक लक्ष विस हजार रूपये प्रमाणे पहिला हप्त्याचे वाटप म्हणजे 8 कोटी 44 लक्ष रूपयाचे वितरण झाले आहे,या गोष्टीचा आनंद झाल्याची भावना त्यांनी यक्त केली तसेच पाटोदा तालुका हा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा बालेकिल्ला असुन सर्वात जास्त प्रेम करणारा तालुका आहे याचा आवर्जुन ऊल्लेख केला, तसेच पंचायत समीती ईमारत आणि निवास्थनाची ईमारत जवळपास 9 कोटी रुपयाचा निधी पंकजाताई मुंडे यांनी मंत्री असताना दिला यामुळे तालुक्याच्या वैभवात भर पडली, पाच लाभार्थी यांना धनादेशचे वितरण केले. या कार्यक्रमास भाजपा नेते काकासाहेब लांबरुड,रामदास बडे( जि.प. सदस्य)स्वप्नील भैय्या गलधर, विक्रांत हजारी,क्रष्णा तिडके, नगरसेवकअ‍ॅड. सुशील कोठेकर,,शाम हुले, संजय सानप, सुनील मिसाळ, संतोष राख, भोसले न्यानेश्वर, विनोद बागंर प्रदीप नागरगोजे, नवनाथ सानप अँड सय्यद अशरफ राजपाल शेडंगे राहुल अडागळे,दिपक जाधव,विजय सानप राजेन्द खाडे बप्पा हुले,आबासाहेब चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!