पाटोदा

सौताडा येथील धबधब्याच्या बाजूला झाडाला लटकलेला मृतदेह सापडला, खून की आत्महत्या, चर्चेला उधान

पाटोदा :लोकाशा न्यूज

सौताडा येथे धबधब्याच्या बाजूला झाडाला लटकलेला अज्ञात मृतदेह सापडला असुन हा खून की आत्महत्या याची चर्चा सौताडा परिसरात चालू आहे. सावताडा रामेश्वर हे पर्यटन स्थळ संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असून येथील निसर्गरम्य धबधबा श्री क्षेत्र रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रोज ये-जा करतात. आज दिनांक 8 / 1 2021 रोजी दुपारी तीनच्या सुमारास सौताडा वनखात्यातील वनरक्षक भाऊसाहेब पेचे नवनाथ उबाळे हे नेहमी प्रमाणे जंगलात गस्त घालत असताना त्यांना मंदिराच्या उजव्या बाजूला छोट्या धबधब्याजवळ एका झाडाला अज्ञात मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहण्यास मिळाला आहे हा मृतदेह अर्धा झाडाला तर अर्धा खाली पडलेल्या अवस्थेत असुन हा खून की आत्महत्या अशी चर्चा आहे. अंगावर तीन गुडीचा शर्ट धोतर डोक्याला पंचा असा पे ह रा व असुन साधारण 55 ते 60 वय असू शकते या वेळी वन रक्षक भाऊसाहेब पेचे यांनी पोलीस स्टेशन पाटोदा येथे फोन वरून खबर दिली असुन पुढील तपास पोलीस करत आहेत

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!