पाटोदा

अल्टो दुचाकीच्या धडकेत एक ठार दोन गंभीर जखमी

अंमळनेर ( लोकाशा न्युज ) बीड अहमदनगर या महामार्गावर डोईठाण ते धामणगाव या रोडवर मंगलकार्यालयाच्या परिसरामध्ये अल्टो कारचा आणी दुचाकीचा भिषण अपघात झाला असुन या अपघातात अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील कापसी येथील एकनाथ गोल्हार हे जागीच ठार तर नातु सुन गंभीर जखमी झाले आहेत हि घटना बुधवारी दुपारी अकरा ते बाराच्या आतमध्ये घडली दुचाकीवरी गोल्हार हे कापसी येथुन धामणगावला निघालेले होते वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली .

नगर कडुन बीडच्या दिशेने जाणाऱ्या अल्टो कार त्यावर पोलीस नाव असणाऱ्या एम एच 06 ए .एफ.2198 या कारने कापसी येथुन दुचाकी एम एच 16 ए .यु. 3429 हिला बीड अहमदनगर या महामार्गावरील धामणगाव डोईठाण मंगल कार्यालयाच्या परिसरात जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीवरील एकनाथ गोल्हार यांचे जागेवरच निधन झाले तर दुचाकीवरील त्यांचे नातु सुन गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगरला दवाखान्यात हलवण्यात आले होते .

बीड अहमदनगर महामार्गावर धामणगाव डोईठाण रोडवर अपघात झाल्याची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते दुचाकीला धडक देणारी अल्टो कार रोडवरच सोडुन वाहन चालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला होता अपघातास कारणीभूत असणारी अल्टो गाडी अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी ताब्यात घेतली असुन सदरील गाडी कोणाची होती ति कुठुन कुठे जाणार होती त्या गाडीत कोण होते याचा तपास अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी सुरु केलेला आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!