केज दि.४(प्रतिनिधी)- केज तालुक्यातील डोणगाव येथे एका आदिवासी महिलेवर शेतात फरफटत नेवून अतिप्रसंग (Rape) झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी केज पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत करीत आहेत.
याबाबत पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादी वरुन, दि.२८ रोजी आरोपी बाळू वैजेनाथ घुले याने रात्री ९.३० ते १०.३० दरम्यान शेतातील पिडितेच्या घराची कडी वाजवली. शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेला पती परत आल्याचे समजून पिडितेने दार उघडले. यानंतर आरोपीने पती कुठे गेला असे विचारले. पती पिकाला पाणी देण्यास गेल्याचे सांगताच तू मला आवडतेस म्हणत पिडितेला शेजारील शेतात तोंड दाबून फरफटत नेवून अतिप्रसंग (Rape) केला. सदरील प्रकार कोणाला सांगितले तर पती मुलासह मारुन टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडित आदिवासी महिलेच्या तक्रारी वरुन बलात्कारासह ॲट्रासिटीचा गुन्हा दि.३ रविवारी नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस (Police) अधिकारी भास्कर सावंत करत आहेत.