केज

केजमधील ‘त्या’ महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या, कपडे खरेदीच्या पिशव्यांवरून पो.नि. प्रदिप त्रिभुवन यांनी काढला खुन्याचा माग


केज, दि. 26 (लोकाशा न्यूज) : केज तालुक्यातील डोका (हादगाव) येथे आत्याच्या वर्ष श्राध्दाधासाठी सांगली येथून माहेरी आलेल्या एका 40 वर्षीय महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून व दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना दि. 25 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती.  या घटनेतील हत्यार्‍याचा तपास लावला असून त्याला गजाआड करण्यात आले आहे.
या बाबतची माहिती येते की, सांगली जिल्ह्यातील माधव नगर, सटण्याचा मळा येथे आपल्या कुटुंबा सोबत राहणारी मीरा बाबुराव रंधवे ही महिला तिची आत्या गांधारी इनकर हिच्या वर्षश्रद्धासाठी डोका (हादगाव) येथे आली होती. तिचा दि.25 नोव्हेंबर रोजी डोका (ता. केज) शिवारातील बोभाटी नदी शेजारील रामचंद्र भांगे यांच्या शेतातील तुरीच्या पिकात तीक्ष्ण हत्याराने गळा कापून व चेहरा ओळखू येऊ नये म्हणून डोक्यात दगड घालून पूर्ण चेहरा चेंदामेंदा करून खून करण्यात आला असल्याची घटना उघडकीस आली होती. सदर महिला ही दि. 24 नोव्हेंबर रोजी केज येेेथे सामान व खरेदीसाठी नातेवाईक सोबत गेली होती. त्यानंतर तिने नातेवाईकांना एका प्रवासी रिक्षाने गावाकडे पाठवून दिले व ती केज येथे मागे थांबली. त्या नंतर तिने एका पुरुषासोबत केज येथील कानडी रोडवरील एका दुकानातून कपडे खरेदी केले. नंतर तो पुरुष व मीरा हे दोघे एका मालवाहू रिक्षातुन डोका येथे गेले. त्या नंतर रात्री 7:00  वा. पासून पुढे तिचा तीक्ष्ण हत्याराने गळा कापून व डोक्यात दगड घालून अज्ञात मारेकर्‍याने खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, अशोक नामदास, पोलिस जमादार अमोल गायकवाड, हनुमंत गायकवाड, शेख मतीन, अशोक गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केजच्या तपास पथकाचे वैभव राऊत, पप्पू अहंकारे, शेख तपासणी पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तपासी पथकाला घटना स्थळावर एक मोबाईल आणि मृतदेहाजवळ कपडे खरेदी केलेल्या दोन पिशव्या आढळून आल्या, त्या वरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून घटनास्थळावर आढळून आलेला मयत मीरा हीच मोबाईल व त्या पिशव्या वरील दुकानाच्या नावावरून तपासला सुरुवात केली, कपड्याच्या दुकानातील सीसीटीव्हीच्या फुटेजवरून मयत मीरासोबत असलेला तो पुरुष कोण? याचा तपास पोलीस घेत असताना तो मस्साजोग (ता. केज) येथील एक वय 45 वर्ष वयाच्या इसमाला पोलीस पथकाने रात्री त्यास संशयित म्हणून ताब्यात घेतले होते,
या निर्घृण खून प्रकरणी मयत मीरा रंधवे हिचे चुलते त्रिंबक ईनकर यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्याला गु.र.नं. 509/2020 भा.दं.वि. 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मीरा रंधवे हिचे शवविच्छेदन अंबाजोगाई येथे करण्यात आले असून तिच्यावर दि.26 रोजी डोका (हादगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यापुर्वीच पोलिसांनी तिच्या मारेकर्‍यास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ज्याला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते, तोच या घटनेतील खरा आरोपी निघाला आहे.

सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे तपासाला
मिळाली गती

दरम्यान खून का केला असावा? हे समजत नव्हते. कारण चोरी म्हणावे तर मयत मिराच्या अंगावरील दागिने चोरीला गेले नव्हते. मग हा खून का केला असावा? हा प्रश्न पोलिसांसमोर असतांना अनुभवी पोलीस अधिकार्‍यांनी सुतावरून स्वर्ग गाठण्यासाठी मृताशेजारी पडलेल्या कपडे खरेदीच्या पिशव्या वरच्या दुकानाच्या नावावरून त्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून संशयित आरोपी ताब्यात घेतला आहे.

प्रदिप त्रिभुवन यांनी खाक्या दाखवताच
आरोपींने दिली कबूली!

घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनीटांनीच सदर व्यक्तीला संशयित म्हणून केज पोलिसांनी ताब्यात घेतले होते, सुरूवातीपासूनच तो गुन्हा कबूल करण्यास तयार नव्हता, गुरूवारी रात्री केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदिप त्रिभवन यांनी त्याला खाक्या दाखवताच तो कबूल झाल्याची माहिती मिळत आहे. रात्री उशीरापर्यंत डॉक पथक घटनास्थळावर दाखल झाले होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!