केज शेतामध्ये असलेल्या एका ४२ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याचा खळबळजण प्रकार आज दुपारी तालुक्यातील हादगाव डोका येथे घडला. घटनेची माहिती पोलिस उपअधिक्षक व केज पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेवून पंचनामा केला. मिरा बाबुराव रनदिवे या महिलेला दगडाने ठेचून जिवे मारण्यात आले. याची माहिती पोलिस उपअधिक्षक व केज ठाण्याचे प्रदिप त्रिभुवन यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या घटनेने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली. महिलेचा खून कोणी आणि का? केला याचा तपास केज पोलिस करत आहेत